आमच्यातील काही गद्दार शत्रूपक्षाला मिळाले : खेडमधील सत्तांतर आढळराव विसरेनात!

(स्व.) सुरेशभाऊ गोरे आमदार असताना खेड तालुका शांत होता. मात्र, आता विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा हप्ता जमा केला जात असल्याने तालुक्यात गुंडगिरी वाढली आहे.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama

चास (जि. पुणे) : खेड पंचायत समितीची हातातील सत्ता राष्ट्रवादीने हिसकावून घेतल्याची घटना शिवसेना (shivsena) नेते विशेषतः माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे अजूनही विसरले नसल्याचे दिसून येते. खेडमधील एका गावात ती खंत त्यांनी बोलून दाखवली. ‘आमच्यातीलच काही गद्दार निघाले आणि शत्रूपक्षाला जाऊन मिळाले, त्याचा परिणाम माजी सभापती भगवान पोखरकरांसारख्या माणसांवर अन्याय झाला. मात्र, हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही,’ असा इशारा आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः आमदार दिलीप मोहिते यांना दिला. (Comment by Shivajirao Adhalrao Patil on the change of power in Khed Panchayat Samiti)

खेड तालुक्यातील वाळद येथील एका कार्यक्रमात माजी खासदार आढळराव बोलत होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि पंचायत समितीचे माजी सभापती, विद्यमान सदस्य भगवान पोखरकर यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले.

Shivajirao Adhalrao Patil
विमानतळ पुन्हा खेडला गेले, तर त्याची जबाबदारी संजय जगतापांची असेल!

आढळराव पाटील म्हणाले की, राजकारणात काम करत असताना आपले घर व आपला गाव पाठीशी असेल तर विजय आपलाच असतो. पण, काम करणारी माणसे नेहमीच दुसऱ्यांच्या डोळ्यात खुपत असतात, त्यातून भगवान पोखरकरांसारख्या माणसावर अन्याय झाला आहे. मात्र, तो आम्ही कधीही विसरणार नाही.

Shivajirao Adhalrao Patil
आमची आजी आजारी हाय, तपासायला घरी चला म्हणत केले डॉक्टरचे अपहरण!

(स्व.) सुरेशभाऊ गोरे आमदार असताना खेड तालुका शांत होता. मात्र, आता विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा हप्ता जमा केला जात असल्याने तालुक्यात गुंडगिरी वाढली आहे. अडचणीच्या वेळी जो धावून जातो, तो शिवसैनिक असतो, हे कायम लक्षात ठेवावे. खेड तालुक्याचे चित्र बदलायचे असेल, तर शिवसेनेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा, असेही आवाहन आढळराव यांनी या वेळी बोलताना केले.

Shivajirao Adhalrao Patil
सभापतिपदाची निवडणूक : शिवसेना-काँग्रेस उमेदवाराचा विजय भाजपच्या हाती!

या प्रसंगी भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांची भाषणे झाली. संभाजी पोखरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विशाल शिंदे यांनी आभार मानले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वर्पे, महिला संघटक विजया शिंदे, खेड तालुकाप्रमूख रामदास धनवटे, उपतालुकाप्रमुख संजय घनवट, अंबर सावंत, युवा नेते नितीन गोरे, सुनील बाणखेले, ज्योतीताई आरगडे, केशव आरगडे, विजयसिंह शिंदे, मनोहर पोखरकर या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com