Pandharpur Politic's : आमदार अभिजीत पाटलांचे विरोधक आले एकत्र; दोन माजी आमदारांसह विठ्ठल परिवारातील बड्या नेत्यांची भोसे येथे हजेरी

Abhijeet Patil Vs Prashant Paricharak : आमदार अभिजीत पाटील यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद देऊन ‘पंढरपूर नगरपरिषद निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रणनीती काय असणार, याबाबत सूतोवाच केले होते.
Pandharpur Political Leader
Pandharpur Political LeaderSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 August : माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांचे माढा आणि पंढरपूर तालुक्यातील सर्व विरोधक आज (ता. 10 ऑगस्ट) पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे एकत्र आले होते. निमित्त होते (स्व.) राजूबापू पाटील स्मृती पुरस्कारांच्या वितरणाचे. पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग आणि विठ्ठल परिवारातील नेत्यांसोबत माजी आमदार संजयमामा शिंदे हे आवर्जून उपस्थित होते. मात्र विठ्ठल परिवारातील भगीरथ भालकेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती राजूबापू पाटील (Rajubapu Patil) यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज भोसे येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे होते. तर पांडुरंग परिवाराचे प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल परिवाराचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, युवराज पाटील, गणेश पाटील उपस्थित होते.

अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील असून त्यांनी अवघ्या चार महिन्यांत माढा तालुक्यात जाऊन साखर कारखानदारीतील मातब्बर माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या चिरंजीवाचा पराभव करून आमदारकी मिळविली आहे. माढ्याबरोबच त्यांनी पंढरपूर तालुक्यातील 43 गावांतूनही चांगले मताधिक्य मिळविले आहे.

विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी माढ्याबरोबरच पंढरपूर तालुक्यातील आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी पंढरपूर नगरपरिषेदत सत्ताधारी प्रशांत परिचारक गटाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

Pandharpur Political Leader
Prakash Ambedkar : शरद पवारांचा ‘तो’ दावा प्रकाश आंबेडकरांनी खोडला; म्हणाले, ‘ किती खोटं बोलावं...’

परिचारकांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी त्यांनी पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनाही आवाहन केले आहे. तसेच विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना परिचारक विरोधी आघाडीत सहभागी होण्याची विनंती केली होती. पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रणनीती काय असणार, याबाबत त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सूतोवाच केले होते.

त्या पत्रकार परिषदेत आमदार अभिजीत पाटील यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डिवचले होते. त्यानंतर परिचारक गटाने पाटील यांना उत्तर देण्यास सुरुवात केली होती. त्यातून आगामी काळात पाटील आणि परिचारक गटात संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसून येत होती. त्याची चुणूक आजच्या कार्यक्रमात दिसून आली.

Pandharpur Political Leader
Mohol Politic's : फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा जाहीर शब्द; ‘राजन पाटलांच्या सूचनेनुसार मोहोळ अन्‌ जिल्ह्याच्या राजकारणात निर्णय होतील’

भालकेंची अनुपस्थिती

विठ्ठल परिवारातील बहुतांश सर्व नेते भोसे येथील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र, विठ्ठल परिवारात सर्वाधिक जनादेश पाठिशी असलेले भगीरथ भालके मात्र आजच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीचे कारण समजू शकले नाही. मात्र, मध्यंतरी झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत पाटील यांनी भालके यांच्यासोबत आमची चर्चा झाली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भालकेंची आजची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com