
Kolhapur News : ऐन सणासुदीच्या काळात देशभरातील भाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहराची बदनामी होत आहे. लोकप्रतिनिधीना याची विचारणा होत आहे. रस्त्यांसाठी आम्ही जीव तोडून निधी आणायचा पण.. महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणामुळे बदनामीला आम्ही सामोरे जायचे. बैठका घेवून सूचना करूनही कामात सुधारणा होताना दिसत नाही.
पुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही. कोणाचीही मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांची सुधारणा झालेली दिसली पाहिजे. अन्यथा.. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
शहरातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाबाबत संताप व्यक्त केला आहे. यासह रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा, अशा सूचना देत एक आठवड्यांची मुदत महापालिका अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे. पण दर्जेदार काम दिसून येत नाही. महानगरपालिका अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नाही. महानगरपालिकेची सल्लागार कंपनी, वॉर्ड अधिकारी, उपअभियंत्यांनी जागेवर जावून पाहणी करणे गरजेचे आहे. त्यांच्या कामातील चुकांमुळे संपूर्ण शहराची बदनामी होत आहे.
कंत्राटदार काम करत नसतील तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्यांचे काम काढून घ्या. काम करणाऱ्या कंत्राटदाराला नव्याने निविदा काढून काम द्या. कोणीही राजकीय दादागिरी करत असेल तर लोकांचे काम थांबविणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. पुढील काळात गलथान कारभार खपवून घेतला जाणार नाही. रस्त्यांची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांच्या कामांची यादी तयार करून त्या-त्या भागातील वॉर्ड अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा. शहरातील प्रत्येक कामासाठी पूर्ण वेळ द्या. हा शेवटचा इशारा असेल पुढील काळात शहरातील रस्त्यासह इतर सर्वच प्रश्न अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला नाही तर कोणालाही माफ केले जाणार नाही, असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.