Maratha Reservation : विद्यार्थ्यानं चक्क उत्तरपत्रिकेत लिहिलं 'एक मराठा कोटी मराठा'

Manoj Jarange News : मनोज जरांगेंनी मराठा युवकांना घातलेली साद उत्तरपत्रिकेतून उमटली आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: मराठा आरक्षणाचा चेंडू मनोज जरांगेंनी सरकारच्या कोर्टात टाकला आहे. उपोषण मागे घेतलं तरी त्यांची धग अद्याप संपलेली नाही. मराठा आरक्षणाचा लढा हा मोर्चा, उपोषणानंतर आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आपल्याला भवितव्य नाही, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये ठळकपणे होताना दिसते.

उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

सध्या शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यास आरक्षणाची मागणी चक्क उत्तरपत्रिकेतून केल्याने उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाचा भुवया उंचावल्या. ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानिमित्ताने मनोज जरांगेंनी मराठा युवकांना घातलेली साद उत्तरपत्रिकेतून उमटली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
Dr. Chitra Kurhe : एका चुकीमुळं फॉरेन रिटर्न महिलेनं सरपंचपद गमावलं!

"जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभूराजे"

बीबीदारफळ (सोलापूर) येथील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोन तारखेला राज्यशास्त्राचा पेपर होता. त्याने उत्तरपत्रिकेत पहिल्या पानावर प्रश्नाचे उत्तर न लिहिता सुरुवातच "जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभूराजे" अशी केली आहे. पहिल्याच पानावर त्याने चक्क "एक मराठा कोटी मराठा" ही घोषणा ठळकपणे मोठ्या अक्षरात लिहिली आहे. राज्यभर या उत्तरपत्रिकेची चर्चा सुरू आहे.

यंत्रणा कामाला लागली...

मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्याने सरकारने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या दोन महिन्यांत मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिला आहे. कुणबी दाखल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Maratha Reservation
Junnar News: जुन्नर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार प्रमुखाच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com