Hingoli : गावाचा विकास करण्यासाठी स्वीडन येथून आलेल्या डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या सरंपच झाल्या, पण एका चुकीमुळे त्यांच्यावर सरपंचपद गमविण्याची वेळ आली. निवडणूक विभागाच्या नियमांचे पालन न केल्याने त्यांना पद गमवावे लागले आहे. हिंगोलीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कुऱ्हे यांनी निवडणूक विभागात निवडणुकीचा खर्च दाखल केला नाही, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. 'फॉरेन रिटर्न सरपंच'म्हणून त्यांची गावात ओळख होती. हिंगोली तालुक्यातील डिग्रस वाणी ग्रामपंचायतीच्या त्या सरपंच होत्या.
परदेशवारी केल्यानंतरही मातीशी घट्ट नाळ असलेल्या पीएचडीधारक डॉ. चित्रा कुऱ्हे यांनी हिंगोलीच्या राजकारणात आपलं नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. वंचित बहुजत आघाडी पुरस्कृत पॅनेलने डॉ. चित्रा कुऱ्हे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. पॅनेलच्या नऊपैकी आठ जागेवर दणदणीत विजय मिळवित चित्रा सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या.
डॉ. चित्रा यांना पाच भाषा अवगत आहेत. स्वीडन येथून त्या गावात आल्या असून, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेत गावकऱ्यांच्या विकासकामांसाठी पुढाकार घेऊन कामे केली आहेत. त्यांनी राज्यशास्त्र या विषयातून स्वीडनमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. परदेशी उच्चशिक्षण घेतल्यानंतरही त्या स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ. चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य आठ वर्षे परदेशी स्थायिक झालं होतं. त्यांनी स्वीडनसह जपानसारख्या काही देशांमध्ये वास्तव केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.