Chandradip Narke : आमदार चंद्रदीप नरकेंना विश्वास पाटलांचं काय खटकलं? खदखद आली बाहेर

Chandradip Narke On Vishwas Patil : करवीर विधानसभा मतदारसंघात माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिवंगत आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मदत केली. राहुल पाटील हे गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी सत्ताधारी म्हणजे आजचे विरोधक यांच्यासोबत होते.
Chandradip Narke On Vishwas Patil
Chandradip Narke On Vishwas Patil sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळ दूध संघाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर केलेल्या वक्तव्याने मतदारसंघातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आमदार नरके यांनी लगावलेला टोला नेमकी कशाची खदखद बाहेर आली? यावरून मतदार संघात चर्चा रंगली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने नव्याने काढलेल्या पेट्रोल पंपाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महायुतीतील आमदार मंत्री आणि महाविकास आघाडीतील नेते आमदार एकत्र मोठा कार्यक्रम पार पडला. या व्यासपीठावर झालेल्या टोलाबाजी नंतर आमदार नरके यांनी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा काढलेला चिमट्याला विधानसभा निवडणुकीची किनार असल्याचेच बोलले जाते.

या कार्यक्रम प्रसंगी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विश्वास पाटील यांना उद्देशून आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे कौतुक करत कर्तबगार अध्यक्ष असा लेख करत डोंगळे यांना महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना कसे सांभाळायचं? हे चांगले कळते. आबाजी आपण मात्र त्यांच्याकडून काहीच शिकला नाहीत.असं म्हणत आमदार नरके यांनी चिमटा काढला. आमदार नरकेंच्या या फटकेबाजीमुळे मतदारसंघात मात्र भलतीच चर्चा रंगात आली आहे.

विश्वास पाटील ज्यावेळी गोकुळमध्ये अध्यक्ष झाले त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे त्यावेळी ग्रामविकास मंत्री पदाचा पदभार होता. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये सत्ता स्थापन केली. त्याला आमदार चंद्रदीप नरके यांची देखील साथ मिळाली. पहिल्या दोन वर्षात विश्वास पाटील हे गोकुळचे अध्यक्ष झाले.

Chandradip Narke On Vishwas Patil
Mahayuti Ministers : भावाच्या मंत्रिपदासाठी आमदारांच्या बंधूंची धावाधाव; दिल्ली-मुंबईत फिल्डींग...

त्याला दोन वर्षे उलटत असताना राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी अरुण डोंगळे यांना अध्यक्ष करण्यात आले. पण विधानसभा निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी महायुतीचे राधानगरी मतदार संघाचे उमेदवार आणि सध्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दिला. मुश्रीफ यांचे ते निकटवर्तीय आहेत. शिवाय गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या हे जवळीक आहेत. सध्या डोंगळे हे महायुतीत असून देखील ते पाटील यांच्या तीतक्याच जवळचे आहेत. त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके यांचे हे कौतुक असावं.

तर दुसरीकडे करवीर विधानसभा मतदारसंघात माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिवंगत आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मदत केली. राहुल पाटील हे गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी सत्ताधारी म्हणजे आजचे विरोधक यांच्यासोबत होते. तर विश्वास पाटलांनी नव्या आघाडीला साथ दिली होती.

Chandradip Narke On Vishwas Patil
Chetan Narke News : आडवा पाय माराल तर गाठ माझ्याशी, शाहू महाराजांना पाठिंबा देताना चेतन नरकेंनी दिला इशारा !

या आघाडीत आमदार नरके यांचा समावेश होता. पण विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणा नुसार राहुल पाटील हे काँग्रेस सोबत राहिले. तर महाविकास आघाडी कुठून आमदार नरके हे शिंदे यांच्या सेने सोबत राहिले. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत विश्वास पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांना पाठिंबा दिला. आमदार नरके यांना निसटत्या मतांनी जे मिळवता आला. पण त्याची सल अजूनही त्यांच्या मनात आहे की काय? अशी चर्चा या निमित्ताने मतदार संघात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com