Prakash Awade : प्रकाश आवाडे अन् पुत्राचा भाजप प्रवेश निश्चित! सुरेश हाळवणकर कोणती भूमिका घेणार?

Prakash Awade Vs Suresh halvankar : सुरेश हाळवणकर यांच्यामुळे आवाडे यांचा भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा होती. मात्र, यातच आवाडे भाजपत आल्यास हाळवणकर कोणता निर्णय घेणार? याकडे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलं आहे.
suresh halvankar | prakash awade.jpg
suresh halvankar | prakash awade.jpgsarkarnama
Published on
Updated on

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये अनेकांची विधानसभा निवडणूक लढवण्याची भावना जागृत झाली आहे. हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता असल्याने माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात चढाओढ निर्माण झाली आहे. तत्पूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचे पुत्र राहुल आवाळे यांची उमेदवारी घोषित करून थेट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला आव्हान दिले होते. त्यामुळे अडचण झालेल्या भाजपने आवाडे यांनाच जवळ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) आणि पुत्र राहुल आवाडे हे बुधवारी ( 25 सप्टेंबर ) केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी ( 24 सप्टेंबर ) दिवसभरात मुंबई येथे तळ ठोकून उमेदवारीचा शब्द घेतला असल्याचे सांगितले जाते.

काँग्रेस ( Congress ) पक्षाशी अत्यंत निष्ठावंत समजले जाणारे आवाडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला 'रामराम' ठोकला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत ( Bjp ) राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पाच वर्षात त्यांनी भाजपसोबत कामही केले आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीकता वाढल्याने ते शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश करणार, अशी चर्चा होती. त्यासह ते भाजप प्रवेश करतील, असंही बोललं जात होतं.

दरम्यान, मंगळवारी दिवसभरात अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. आमदार प्रकाश आवाडे यांनी मुंबईत तळ ठोकला होता. रात्री आठ वाजल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये भाजप प्रवेशाबाबतची कुजबूज सुरू झाली आहे. तर भाजपच्याही प्रमुख पदाधिऱ्यांना याबाबतचा संदेश पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आला. वरिष्ठ पातळीवरुन निर्णय झाल्यामुळे स्थानिक भाजपमधून अद्याप तरी कोणतीही याबद्दल प्रतिक्रिया आलेली नव्हती.

suresh halvankar | prakash awade.jpg
Kolhapur Politics : 'कोल्हापूर उत्तर' आमचंच..., दावा सगळ्यांचा; पण डाव कोण साधणार ?

हाळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष..

आमदार आवाडे यांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीला तेही इच्छुक आहेत. त्यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, राहुल आवाडे हे उमेदवारीचा शब्द घेऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये आल्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर हे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com