Kolhapur Politics : 'कोल्हापूर उत्तर' आमचंच..., दावा सगळ्यांचा; पण डाव कोण साधणार ?

Assembly Election 2024 : गेल्या पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढत असताना क्षीरसागर यांच्यापुढे बरीचशी आव्हान आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांवरून क्षीरसागर हे महाविकास आघाडीला चांगली टक्कर देऊ शकतात.
Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्येच या मतदारसंघातील उमेदवारीवरून मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तर महायुतीमध्ये देखील भाजपा अंतर्गत आणि शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून खदखद आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात वाढलेली हिंदुत्वाची ताकद यामुळे भाजपसह शिवसेनेच्या आशा वाढल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) इच्छुकांच्या इच्छा बळावल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे. सर्वच पक्षांनी दावा सांगितला आहे. मात्र, दावा सांगत असताना या मतदारसंघात डाव साधणारा एक ही पैलवान दोन्ही बाजूला नसल्याच दिसून येत आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे ही विद्यमान जागा आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला जाईल अशी दाट शक्यता आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीला ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष व्ही.बी पाटील यांनी केली आहे. केवळ मागणीच नाही तर हट्टाला पेटली आहे. राष्ट्रवादीकडून व्ही.बी पाटील हे उत्तरेच्या रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत.

काँग्रेसकडून आमदार जयश्री जाधव, शहराध्यक्ष सचिन चव्हाण हे दोन उमेदवार इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद उमेदवारीवरून सुरू झाला आहे. उपनेते संजय पवार, माजी जिल्हाध्यक्ष विजय देवने आणि शहराध्यक्ष रविकिरण इंगवले हे देखील कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत आहेत.

Rajesh Kshirsagar
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे 'एन्कांऊटर' प्रकरणात मोठी अपडेट

पण वास्तविक पाहता या सर्वच उमेदवारांपैकी बलशाली उमेदवार सध्याच्या घडीला महाविकास आघाडीकडे नाही. जो सर्वोतोपरी महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला टक्कर देऊ शकेल. कोल्हापूर शहरात वाढलेली महाविकास आघाडीची ताकद आणि आमदार सतेज पाटील यांचे नियोजन हीच महाविकास आघाडीची जमेची बाजू आहे.

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या सूचनेनुसारच उत्तरेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. कारण सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात केवळ काँग्रेसच बलशाली आहे. जिल्ह्यात काँग्रेसला सतेज पाटील यांचा चेहरा असल्याने ते म्हणतील तोच उमेदवार ठरणार आहे.

यदा कदाचित महाविकास आघाडीकडे उमेदवार नसल्यास आमदार सतेज पाटील हे देखील 'कोल्हापूर उत्तर'च्या मैदानात उतरू शकतील. ही शक्यता देखील नाकारू शकत नाही. मात्र सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये निवडून येण्या क्षमतेचा उमेदवार सध्या तरी दिसत नाही हे नक्की.

Rajesh Kshirsagar
Sharad Pawar Politic's : रमेश कदमांनी दुसऱ्यांदा घेतली पवारांची भेट; मोहोळमधून तुतारीवर लढण्याचा निर्धार

महायुतीमध्ये देखील उमेदवारीवरून अंतर्गत खदखद सुरू आहे. भाजपमधील अंतर्गत खदखद ही गणेश विसर्जन मिरवणुकीत समोर आली. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव हे देखील इच्छुक आहेत.

मात्र, महाविकास आघाडीला टक्कर देणारा एक ही तुल्यबळ उमेदवार सध्याच्या घडीला भाजपकडे नाही. तर शिवसेना शिंदे गटाकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उत्तरेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. जर भाजपने ही जागा सोडल्यास आणि शिंदे गटात सोबत एक जुटीने काम केल्यास पुन्हा एकदा भगवा या मतदारसंघावर फडकता येईल.

गेल्या पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढत असताना क्षीरसागर यांच्यापुढे बरीचशी आव्हान आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामावरून क्षीरसागर हे महाविकास आघाडीला चांगली टक्कर देऊ शकतात. जर महायुतीमधील अंतर्गत वाद असेच राहिले तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. हे मागील विधानसभा निवडणुकीत ही सर्वांनी पाहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com