Prakash Awade : आमदार आवाडेंचा महायुतीवर दुसरा वार, हातकणंगलेतील उमेदवार जाहीर करून वाढवला दबाव

hatkanangale Assembly Constituency : आमदार आवाडे यांनी इचलकरंजी पाठोपाठ हातकणंगले विधानसभा मतदारसंघात दुसरा उमेदवार जाहीर केला.
prakash awade | devendra fadnavis | eknath shinde | ajit pawar
prakash awade | devendra fadnavis | eknath shinde | ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

इचलकरंजीमधील ताराराणी आघाडीचे आणि महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुतीवरील दबाव आणखीन वाढवला आहे. इचलकरंजी मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला असताना आमदार आवाडे यांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पवार गटावर दुसरा वार केला आहे.

आमदार आवाडे ( Prakash Awade ) यांनी इचलकरंजी पाठोपाठ हातकणंगले विधानसभा मतदारसंघात दुसरा उमेदवार जाहीर केला. हेरले येथील माजी सभापती जयश्री जयवंत कुरणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महायुतीमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि घटक पक्ष असलेल्या आमदार विनय कोरे यांच्या 'जनसुराज्य शक्ती' पक्षानं दावा केला आहे. विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने मागीलवेळी या मतदारसंघातून 'जनसुराज्य शक्ती'चे उमेदवार अशोकराव माने यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे हा मतदारसंघ 'जनसुराज्य शक्ती' पक्षाकडेच जाईल, अशी शक्यता आहे. मात्र, आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाकडून स्वतःचा उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान, आमदार प्रकाश आवाडे यांनी परस्पर इचलकरंजी मतदारसंघात त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर करून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची गोची निर्माण केली होती. आता तोच पॅटर्न हातकणंगले विधानसभा मतदारसंघात राबवत त्यांनी परस्पर ताराराणी आघाडीचा उमेदवार जाहीर करून महायुतीची कोंडी केली आहे. त्यामुळे महायुती आणि विनय कोरे यांचा 'जनसुराज्य पक्ष' कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

prakash awade | devendra fadnavis | eknath shinde | ajit pawar
Kolhapur Politics : घाटगे-देसाईंच्या समर्थकांना नारळ, जिल्ह्यातील विविध समित्यांवरून दिला डच्चू

कोण आहेत जयश्री कुरणे?

जयश्री कुरणे यांनी पॉलिटिक्स(राज्यशास्त्र) या विषयात एम.ए. पर्यंतची पदवी प्राप्त केली आहे. त्या स्वत: क्षितीज सामाजिक संस्थेच्या संस्थापिका असून महिला राजसत्ता आंदोलन बेलापूरच्या पश्‍चिम महाराष्ट्र कोकण विभागाच्या विभागीय समन्वयक आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या पंचायत राज विभाग, हमारा संकल्प संस्था न्यू दिल्ली, जलजीवन मिशन अंतर्गत पृथ्वी संग्राम संस्था सांगली, कोल्हापूर जिल्हापरिषद ग्रामपंचायत विभाग, आयएसडी न्यू दिल्ली राजकीय विकास नेतृत्व अंतर्गत ट्रेनर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यशदा ट्रेनिंग सेंटरच्या ग्रामपंचायत मॉड्युल विशेषतज्ञ, कौटुंबिक हिंसाचार समुपदेशन केंद्रात कार्य केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अग्रेसर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com