निलंगा : केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळेच मला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी त्याबाबतचा किस्सा सांगितला. मी केवळ जलसंपदा मंत्री होतो. तुम्ही जलसंपदा मंत्री व अर्थमंत्रीही आहात, त्यामुळे मराठवाड्याच्या सिंचनासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणीही जयंतरावांनी भाषणातून उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. (Fund should be provided for irrigation of Marathwada: Jayant Patil's demand to Fadnavis)
निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या मैदानावर गुरूवारी (ता. ९ फेब्रुवारी) माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हेाते. त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी फडणवीस यांना गळ घातली.
जयंत पाटील म्हणाले की, जुन्या माणसाचे कार्य हे भावी पिढीला आदर्श ठरतात. त्याप्रमाणे नवतरूणांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सिंचनाची सुविधा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली, हे विसरून चालणार नाही. शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी मराठवाडा, विदर्भ, कोकण भागात सिंचनाचे मोठ्या सुविधा निर्माण केल्या असून लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात खुप चांगले काम झाले आहे. पश्चिम भागातील पाणी पूर्वेला आणल्याशिवाय मराठवाड्याचा विकास होणार नाही. जुने व्यक्ती...जुने नेते यांचे कार्य समाज उपयोगी असते. त्यांचे पक्षासाठीचे विचार कट्टर राहिले आहेत.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे चारित्र्य संपन्न व निर्वसनी नेतृत्व होते; म्हणूनच त्यांनी दहा वेळा या मतदार संघाचे नेतृत्व केले. आमचे व आमच्या वडीलांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते, असे सांगून मराठवाड्याच्या सिंचनासाठी आपण येत्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात तरतुद करावी, अशी मागणीही पाटील यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली
या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सुशीलाताई पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री संजय बनसोडे, रूपाताई पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, अभिमन्यू पवार यांच्यासह जिल्ह्यातील माजी खासदार, माजी आमदार उपस्थित होते.
पहिले तिकिट चाकूरकरांनी मिळवून दिले
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीच मला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे घेऊन जात पहिल्यांदा तिकीट दिले होते, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.