Karad News : भाजपा आणि काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीपासून देशपातळीवर आरोप- प्रत्यारोप होत आले आहेत. डोंबवली- मुंबई मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असलेले आणि भाजपा नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. बैलगाडी शर्यत जिंकायची असेल तर थकलेला बैल कामाचा नसतो. त्याप्रमाणे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी क्षमता संपलेला असेल, मतदार संघाची परिस्थिती काय असेल असा टोला पृथ्वीराज चव्हाणांना लगावला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील कापील येथील कापील विकास सेवा सोसायटीचा शताब्दी महोत्सव सोहळा व अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) बोलत होते. यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते.
आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, रामकृष्ण वेताळ उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी शहरी भागात वावरलो असलो, तरी मला शेती आणि बैलांचा नाद आहे. बैलगाडी शर्यतीवेळी एकास एक बैल असेल, तर ती शर्यत जिंकता येते. बैल थकलेला असेल तर शर्यत जिंकणे कठीण राहते. तशाच प्रकारे पूर्ण क्षमता संपलेला लोकप्रतिनिधी असेल, तर त्या मतदारसंघातील परिस्थिती काय असेल हे सांगायला नको. अशी टीका नाव न घेता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.
तर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आमदार नसतानाही अतुल भोसले यांनी विद्यमान आमदारांच्यापेक्षा पाच पट जादाचा निधी आणला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या माण- खटाव मतदार संघात दुष्काळ हटविण्यासाठी मोठा निधी दिला. दर आठ दिवसाला सरकार नवीन योजना देत असून पुढच्या पाच वर्षांत माण- खटाव दुष्काळग्रस्त राहणार नाही. कराड दक्षिण मतदार संघातही त्याच पध्दतीने विकास होण्यासाठी आता विधानसभेत जाण्याची संधी अतुल भोसलेंना द्यावी, असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.