आमदार संजय शिंदे-प्रशांत परिचारकांच्या मैत्रीची दूध पंढरीच्या आखाड्यातून नवी सुरुवात!

जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही विधान परिषदेची आगामी निवडणूक पाहता अनेक घडामोडी घडू शकतात.
Prashant Paricharak-Sanjay Shinde-Rajendra Raut
Prashant Paricharak-Sanjay Shinde-Rajendra RautSarkarnama

सोलापूर ः भारतीय जनता पक्षाची राज्यात असताना आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) आणि माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रस्थापित नेतेमंडळींच्या विरोधात राजकीय पर्याय उभा केला होता. अर्थातच त्यामागे भाजपच्या सत्तेचा मोठा वाटा होता. मध्यंतरीच्या काळात समविचारीतच फूट पडली. मात्र, आता जिल्हा दूध संघाच्या (दूध पंढरी) निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-परिचारक हे दोन्ही मित्र पुन्हा एकत्र येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही विधान परिषदेची आगामी निवडणूक पाहता अनेक घडामोडी घडू शकतात. (MLA Sanjay Shinde-Prashant Paricharak's friendship started anew)

समविचारीच्या माध्यमातून आमदार शिंदे व माजी आमदार परिचारक यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत एक समर्थ राजकीय पर्याय दिला होता. यामध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे यांची साथ मिळाली होती. माजी आमदार (कै.) गणपराव देशमुख यांचीही भूमिका नव्या दमाच्या जुन्या समविचारींसोबत होती. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अनेक राजकीय चमत्कार या काळात घडले. पण, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत स्थानिक समिकरणे बदलली. ज्यांच्या विरोधात बंड केले, ती मंडळी एकमेकांच्या मांडलीला मांडी लावून बसू लागली. समविचारीच्या माध्यमातून ज्यांनी राजकीय चमत्कार घडविला, ते एकमेकांच्या विरोधात उभी ठाकले. विधानसभा निवडणुकीअगोदर मोठ्या प्रमाणात झालेली पक्षांतरे, त्यानंतर राज्यात आलेली राष्ट्रवादीची सत्ता या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या कोण कोणासोबत आहे, हेच भल्या भल्यांना पडलेले कोडे आहे.

Prashant Paricharak-Sanjay Shinde-Rajendra Raut
राणेंची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; नगराध्यपदासाठी समर्थकाचा भाजप उमेदवारापुढे शड्डू!

सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा श्रीगणेशा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा दूध संघात शिंदे आणि परिचारक यांना बरोबर घेतल्याशिवाय सत्तेचे गणित पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे या दोघांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची निवडणूक रणनीतीबाबत बैठक झाली. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची ताकदही दूध संघाच्या राजकारणात वाढली आहे. त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्वाची ठरणार असून सर्वपक्षीय श्रेष्ठी त्यांनाही बिनविरोधमध्ये सामावून घेणार का, असा प्रश्न आहे. सोलापूर जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, नगरपरिषदा आणि सर्वात कळीचा मुद्दा असणारी विधान परिषद निवडणूक अशा निवडणुका आगामी काळात असणार आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर शिंदे-परिचारक या जुन्या मैत्रीची नव्याने राजकीय सुरुवात झाली आहे. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून मिळालेला लोकल फॉर्म्युला आगामी निवडणुकांसाठीही वापरला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Prashant Paricharak-Sanjay Shinde-Rajendra Raut
एकाच घरात राष्ट्रपती अन्‌ पंतप्रधान; पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना साकडे!

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आमदार शिंदे यांना डावलून २०१९ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी जुळवाजुळव केली होती. पण, सत्ता आपल्या हाती येत नाही, हे ओळखून शिंदे यांना ऐनवेळी सोबत घेतले होते. मात्र, तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते, त्यामुळे त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. तो अनुभव लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दूध संघाच्या निवडणुकीत संजय शिंदे यांना सोबत घेतले आहे. लोकसभेची निवडणूक माढ्यातून लढण्याची जबाबदारी संजय शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने सोपवली होती. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीसोबत असलेले संबंध लक्षात घेऊन त्यांनी ती निवडणूक लढवली. पण, त्यात त्यांना यश आले नाही. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी अनपेक्षितपणे आली. मात्र, राष्ट्रवादीला एकत्रितपणे पुढे घेऊन जाणाऱ्या नेत्याची जिल्ह्यात वानवा आहे. ती क्षमता आमदार संजय शिंदे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे मंत्रीपद देऊन सोलापुरातील राष्ट्रवादी आणखी बळकट करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com