त्यावेळी मला मंत्रीपदाची ऑफर होती; पण... : राऊतांच्या आरोपाला संजय शिंदेंचे उत्तर

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात खासदार संजय राऊतांनी केलेले आरोप आमदार संजय शिंदे यांनी फेटाळले
Sanjay Shinde
Sanjay ShindeSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला घरी बोलावून कोणकोणत्या ऑफर दिल्या होत्या आणि त्यातील कोणत्या ऑफर मी स्वीकारल्या होत्या, हे त्यांना जरा विचारा आणि त्यानंतरच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझ्यावर आरोप करावेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) राऊत यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे सांगून करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले. दरम्यान, सरकार स्थापन करताना मला मंत्रीपदाची ऑफर दिली होती, त्यावेळी मला विमानाने नेण्यात आले होते, असा गौप्यस्फोटही शिंदे यांनी या वेळी केला. (MLA Sanjay Shinde refutes MP Sanjay Raut's allegations)

राज्यसभा निवडणुकीत आम्हाला काही अपक्ष आमदारांची मते मिळाली नाहीत. शब्द देऊनही त्यांनी आम्हाला मदत केली नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला उत्तर देताना आमदार शिंदे यांनी वरील माहिती दिली. आमदार शिंदे म्हणाले की, माझ्यावरील घोडेबाजाराचा आरोप चुकीचा आहे, माझा आणि संजय राऊत यांचा तेवढा संपर्क नाही. त्यामुळे माझे राजकारणातील वर्तन कसे आहे, हे राऊत यांना माहीत नाही. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेतेमंडळी भेटणे जरा मुश्कीलच आहे, त्यातूनच अपुऱ्या माहितीमुळे त्यांनी माझ्यावर हे आरोप केले असावेत, असं मला वाटतं.

Sanjay Shinde
लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांना फडणवीसांनी अर्पण केला राज्यसभा निवडणुकीतील विजय!

सरकार स्थापन होत असतानाच मी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे, हा पाठिंबा कोणत्याही अटीशिवाय दिलेला आहे. फक्त करमाळा तालुक्याच्या विकासासाठी मी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेला आहे. तसेच, राज्यसभा निवडणुकीत महाआघाडीच्या नेत्यांच्या सूचनांचे आम्ही पालन केले आहे. मी कुणाच्या कोट्यात येणार आहे, याची आम्ही वाट पाहत होतो. त्यात मला शिवसेनेच्या कोट्यात मतदान करावे लागले. मला पाहिले मत संजय पवार आणि दुसरे मत संजय राऊत यांना द्यायला सांगितले होते. त्यावेळी आमच्याबरोबर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत हेही होते. त्यांनी दिलेला कागद पुढे ठेवूनच आम्ही मतदान केले आहे, असे संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

Sanjay Shinde
दगाबाज आमदारांना फूस लावणारा महाविकास आघाडीतला बडा नेता कोण?

आमदार शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सूचनेनुसार आम्ही मतदान केले आहे. आमच्यावर त्यांचा विश्वास नसता तर आम्हाला मतदानालाच घेऊन जायचे नव्हते. आम्हाला थांबवून ठेवायचे होते. महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे नेते आमच्याबरोबर होते, त्यामुळे राऊतांनी असे आरोप करणे चुकीचे आहे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले की, मी घोडेबाजारातील आहे की नाही, हे सर्वांना माहीत आहे. मला शिवसेना प्रवेशाच्या अनेकदा ऑफर दिल्या होत्या. मी घोडेबाजारातील असतो तर मी मागेच विकलो असतो. ज्या नेत्यांवर विश्वास ठेवून काम करतो, त्यांचा आमच्यावर संपूर्ण विश्वास आहे. मी हरभरा खाणाऱ्यांपैकी आहे की नाही, हे उद्धव ठाकरे आणि इतर नेतेमंडळींना माहिती आहे.

Sanjay Shinde
संजय राऊतांमुळेचं भाजपला यश ; गिरीश महाजनांनी सांगितलं विजयाचं गमक

या आरोपांची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर होईल. ही व्यथा आम्ही आमचे नेतेमंडळी यांच्यापुढे मांडणार आहोत. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट आम्ही घालणार आहो, असेही संजय शिंदे यांनी या वेळी स्पष्टपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com