Shahaji Bapu Patil Accident News : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; एक ठार, एक चिंताजनक

या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Shahajibapu Patil News
Shahajibapu Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

सांगोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील (Shahajibapu Patil) यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला (क्रमांक एमएच १४, डी एम ९४४०) अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना सांगोला (Sangola) तालुक्यातील माळवाडी-नाझरा येथे आज (ता. ९ फेब्रुवारी) साडेचारच्या सुमारास घडली आहे. (MLA Shahajibapu Patil's car in convoy collided with an accident)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी आमदार शहाजीबापू पाटील हे नाझरा येथे गेले होते. आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपवून आमदार पाटील हे सांगोला शहराकडे येत होते. आमदार पाटील यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांची एक संरक्षक गाडी होती.

Shahajibapu Patil News
Pandharpur News : जयंत पाटलांच्या दौऱ्याआधीच पंढरपूर राष्ट्रवादीला मोठा धक्का : तालुकाध्यक्षांचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर

आमदार पाटील यांच्या गाड्यांचा ताफा माळवाडी-नाझरा (ता. सांगोला) येथे आला असता, आमदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांच्या गाडीला विरोध दिशेन येऊन एक दुचाकीस्वार धडकले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजक आहे. पोलिस गाडीचा क्रमांक एम एच १४ डी एम ९४४० असा आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Shahajibapu Patil News
Pradnya Satav Attack : मी स्वतःहून हल्ला केला नाही; मला करायला लावला : हल्लेखोराने कबुली दिल्याचा सातव यांचा दावा

दरम्यान, अपघाताच माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वराला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com