Pradnya Satav Attack : मी स्वतःहून हल्ला केला नाही; मला करायला लावला : हल्लेखोराने कबुली दिल्याचा सातव यांचा दावा

काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी पकडलेल्या हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Pradnya Satav
Pradnya SatavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसच्या (Congress) आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी (Attack) पोलिसांनी (Police) एकाला ताब्यात घेतले आहे. त्याने हल्ल्याची कबुली दिली आहे. मात्र, हा हल्ला मी स्वतःहून केलेला नाही. मला तो करायला लावला आहे, अशी कबुली हल्लेखोराने पोलिस तपासात दिली आहे, अशी माहिती आमदार प्रज्ञा सातव यांनी दिली आहे. (I did not attack Pradnya Satav by myself; Made me do it : Confession of the attacker)

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या गावात हल्ला झाला आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी पकडलेल्या हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीत त्यांनी हा हल्ला मी स्वतःहून केलेला नसून मला तो करायला लावला आहे, अशी कबुली दिल्याचे प्रज्ञा सातव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Pradnya Satav
Cash For Ministership : मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी : भाजप आमदारांबरोबरच कॅबिनेट मंत्र्यालाही फसविण्याचा प्रयत्न

आमदार सातव म्हणाल्या की, मागील नोव्हेंबरमध्ये आम्ही भारत जोडो यात्रेची तयारी करत होतो, त्यावेळी पेडगावमध्ये एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास माझ्यावर पहिल्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी मी काही जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. त्यानंतर बुधवारी दुसऱ्यांदा कसबे धावंडा या गावी माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही, या भूमिकेतून मी पोलिसांत तक्रार दिली आहे.

Pradnya Satav
Pradnya Satav News : प्रज्ञा सातव यांचा मोठा गौप्यस्फोट : नोव्हेंबरमध्येही माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पण मी सिरियसली घेतले नव्हते...

पोलिस तपासाबाबत आताच समाधान व्यक्त करता येणार नाही. कारण, पकडण्यात आलेला व्यक्ती या प्रकरणामागे कोण आहे, हे सांगत नाही. तो सांगतो आहे की मी स्वतःहून हे केलेले नाही. मला हे करायला सांगितले आहे. इथपर्यंत त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे. पण, त्याला हे कोणी करायला सांगितले, त्याचं नाव सांगण्यास तो घाबरत आहे. या हल्लामागील सूत्रधाराचे नाव समोर येत नाही; तोपर्यंत आम्ही समाधान व्यक्त करू शकत नाही, असेही सातव यांनी नमूद केले.

Pradnya Satav
Sudhir Mungantiwar At Baramati : अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळ बैठकीतच सांगितले अन तातडीने बारामती दौरा ठरविला : मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

या हल्ल्यामागे कुठची तरी मोठी ताकद असू शकते. कारण, आमदारावर आणि तेही महिला आमदारावर हल्ला करणं, यामध्ये कोणीतरी मोठी व्यक्ती पाठीशी असल्याशिवाय एवढं मोठं धाडस कोणी करणार नाही. तसेच आमची ताकद वाढताना दिसून येत आहे. आम्हाला जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून आमचे दौरे कुठेतरी थांबविले पाहिजे. तसेच महिला आहे, तिला घाबरवून घरी बसवलं पाहिजे, अशा पद्धतीने काही लोक काम करत असतील, हे नाकारता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com