MLA Shahaji Patil News : आमदार शहाजीबापूंच्या लोकप्रियतेचा विदेशातही डंका; नेमकं काय झालं ?

Sangola News : ऑस्ट्रियातील एका कंपनीच्या स्पर्धेत पाटील यांच्या प्रतिमेचा सहभाग
Shahaji Patil
Shahaji PatilSarkarnama
Published on
Updated on

दत्तात्रय खंडागळे

Solapur News : "काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल..' या वाक्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या राज्य-देशाबरोबरच बापूंच्या लोकप्रियतेचा डंका विदेशातही गाजत असल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रिया या देशामध्ये सामान्य ज्ञान व मनोरंजनासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आमदार शहाजी पाटील यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

हॉर्बीगर लिमिटेड प्रा. इंडिया ही कंपनी जगभरातील १२८ देशांमध्ये कार्य करते. या कंपनीचे मुख्य कार्यालय ऑस्ट्रिया (Austria) देशातील वियन्ना (Vianna) येथे आहे. ही कंपनी कंपनीतील कर्मचारी यांच्या सामान्य ज्ञानासाठी व मनोरंजनासाठी महिन्यातून काही कार्यक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून ऑस्ट्रिया या देशांमधून कर्मचारी यांच्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये जगभरातील अग्रण्य प्रसिद्ध कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचे फोटो प्रसारित करण्यात येतात व ६ सेकंदामध्ये या व्यक्तींना ओळखून त्यांचे नाव सांगायचे असते.

Shahaji Patil
Ajit Pawar News : अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना दम; 'दुसरीकडे सहज गेलो असे म्हणाल तर मीही सहजच नाव वगळेल'

या स्पर्धेमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांच्या प्रतिमेचा समावेश होता. प्रतिमा पाहून महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर इंजिनिअर यांचा आनंदाने उर भरून आला. परदेशातून परत आल्यानंतर इंजिनियर मंडळींनी आमदार शहाजी पाटील यांची सांगोला येथे भेट घेत, तुम्ही पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला असल्याची आनंद भावना व्यक्त केली. यावरून आमदार शहाजी बापू पाटील यांची लोकप्रियता जगामध्ये झाली असल्याचे दिसून येते.

Shahaji Patil
Name Change News : शेवटच्या दिवशी आक्षेप आणि समर्थनार्थ अर्जांचा पाऊस...

याबाबत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले विकास राऊत म्हणाले, "मी हॉर्बीगर प्रा. लिमिटेड इंडिया या कंपनीमध्ये काम करतो. या कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी ऑस्ट्रिया या देशामध्ये सामान्य ज्ञान व मनोरंजनासाठी काही स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातील सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सांगोला (Sangola) मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमेचा समावेश होता. ते पाहून आम्ही महाराष्ट्रातील इंजिनियर मंडळी भारावून गेलो. मी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील असल्याने माझ्याबरोबरील १७८ सहकारी मित्रांना माझ्याबद्दल वेगळा आदर निर्माण झाला."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com