भाजपला पाठिंबा देण्याऱ्या आमदाराचे शक्तिपीठासाठी शक्तिप्रदर्शन; थेट राजू शेट्टी कोण? म्हणत सतेज पाटलांवरही साधला निशाना

MLA Shivaji Patil On Satej Patil and Raju Shetti : समृद्धी महामार्गाला सुद्धा अनेकांनी विरोध केला. मात्र आता आपण पाहतोय समृद्धी महामार्गामुळे दळणवळण सोपं झालं असून मराठवाड्याला सुद्धा याचा किती मोठा फायदा झाला आहे.
 Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwaySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून काहींचा विरोध होत असताना आज गडहिंग्लज येथे शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पदयात्रा पार पडली. यावेळी अनेक शेतकरी स्वतःचे सातबारे घेत या पदयात्रेत उतरली होती. गडहिंग्लज शहरातल्या मुख्य मार्गावर पदयात्रा पार पडली. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड मार्गे जावा अशी मागणी केली. (Farmers hold Padyatra in Gadhinglaj supporting Shaktipith Highway; demand route via Chandgad as MLA slams Congress and Raju Shetti)

समृद्धी महामार्गाला सुद्धा अनेकांनी विरोध केला. मात्र आता आपण पाहतोय समृद्धी महामार्गामुळे दळणवळण सोपं झालं असून मराठवाड्याला सुद्धा याचा किती मोठा फायदा झाला आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा विकास होणार आहे. आमच्या या भागात आजपर्यंत म्हणावा तसा विकास झाला नाही. आजचे आमचे आंदोलन किंव्हा मोर्चा नाही. मात्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ ही रॅली असल्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.

आमच्याकडे पर्यटन वाढावे आणि अनेक तरुणांना रोजगार या माध्यमातून वाढावे अशी आमची इच्छा आहे. चंदगड पासून गोवा आणि बेळगाव जवळ आहे. ते विकसित झाले आहे. मात्र चंदगडमध्ये सुद्धा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. विरोधक विरोध करत राहतील त्यांचे ते काम आहे.

 Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway: खोटी बिले दाखवून आमदारानं लाटले ८६ लाख रुपये? आता 'शक्तिपीठ' मध्ये 'मलई' चाखणार...; राजू शेट्टींचा घणाघात

मात्र आजच्या मोर्चात शेतकरी आणि भाजपची कार्यकर्ते सर्वसामान्य लोक आहेत कॉलेजचे तरुण आहेत. या सर्वांना माहीत आहे आपल्या भागातला विकास झालेला नाही. निदान या महामार्गामुळे विकासाला गती येईल. जेव्हा हा महामार्ग होईल त्यानंतर विरोधात तोंडात बोट घालतील. असा टोला आमदार शिवाजीराव पाटील यांनी विरोधकांना लगावला.

सतेज पाटील हे विरोधी गटातील नेते आहेत, मात्र त्यांनाही माहित आहे. या भागात विकास हवा आहे. त्यांचे काही जास्त मनावर घेऊ नका. ते सुद्धानंतर महामार्ग झाल्यावर सरकारचे अभिनंदन करतील, असा खोचक टोला आमदार पाटील यांनी सतेज पाटील यांना लगावला.

 Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ची टांगती तलवार! सरकारकडून फेरविचार होणार?

राजू शेट्टी यांच्या बद्दल बोलताना, कोण हे राजू शेट्टी? राजू शेट्टी काय होते. आज त्यांचेच सहकारी त्यांच्या सोबत आहेत का? त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीवेळी त्यांचे कार्यकर्ते कारखानदारांसोबत होते. त्यांच्या याच स्वभामुळे त्यांचे कार्यकर्ते सोडून गेले. एक हाना पण नेता म्हणा अशी परिस्थिती आता या नेत्यांची झाली असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com