गायरान जमिनीबाबत आमदार पवार, शिंदे यांचे सरकारला साकडे

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ), आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी सरकारकडे साकडे घातले आहे.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama

संतराम सूळ

Ram Shinde Vs Rohit Pawar : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत ‘रान’ उठले आहे. अतिक्रमणे काढल्यास अनेक जण बेघर होतील. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवेल. यासाठी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ), आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी सरकारकडे साकडे घातले आहे.

आमदार रोहित पवार यांनी याप्रश्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्य सरकारकडून तत्काळ प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढल्यास राज्यभरातील अडीच ते तीन लाख अथवा त्याहून अधिक कुटुंब व जवळपास १२ ते १५ लाखांहून अधिक लोक बेघर होऊ शकतात. परिणामी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्‌भवणार असल्याचे पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Ram Shinde Vs Rohit Pawar
रोहित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगेंची भेट घेवून केलं सांत्वन...

या प्रश्नी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. येत्या दोन दिवसात तशी याचिका दाखल करणार असल्याची माहिती आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली. यासंदर्भात आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास अनेक कुटुंब बेघर होणार आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी शिंदे यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारतर्फे येत्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Ram Shinde Vs Rohit Pawar
राम शिंदे नव्हे तर शरद पवारचं मागच्या दराने आले..

दरम्यान, वंचित बहुजन पक्षाचे जिल्हा निमंत्रक ॲड. अरुण जाधव यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रश्री निवेदन दिले आहे. सरकारी गायरान जमिनीच्या मिळालेल्या मालकी हक्कामुळे अनेक दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि भूमिहीन शेतमजूर गायरान जमिनीवर पिके घेऊन उपजीविका भागवत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com