MNS News : ''व्यापाऱ्यांनो मराठी पाट्या लावा अन्यथा...'' 'मनसे'चा कराडमध्ये इशारा!

Marathi Board : सक्तीपेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे, अशी भूमिका मनसेच्यावतीने मांडण्यात आली आहे.
MNS Karad
MNS KaradSarkarnama
Published on
Updated on

विशाल वामनराव पाटील -

मुंबई, पुण्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामीण भागातही मराठी पाट्यांच्या मुद्यावर आक्रमक होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात मराठी पाट्यांचा मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.

तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा दिल्यानंतर आता साताऱ्यातील कराडमध्येही व्यापाऱ्यांना मनसेने खळखट्ट्याकचा इशारा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच आठ दिवसांत इंग्रजी पाट्या काढुन मराठी पाट्या लावाव्यात अन्यथा मनसे (MNS) स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MNS Karad
Anil Deshmukh : ''अंतरवाली सराटीतील 'तो' लाठीचार्ज फडणवीसांच्याच आदेशाने'' ; अनिल देशमुखांचा दावा!

याबाबत तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, पै. सतिश यादव, नितीन महाडीक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ केतन जाधव, शंभूराजे भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, ''वास्तविक सक्तीपेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यवसायिक दुकानाला मराठीत पाटी लावत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी 25 नाहेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र, कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना अद्याप इंग्रजीत पाट्या आहेत. प्रशासनाने अशा दुकानांचा सर्व्हें करावा.''

MNS Karad
Rahul Narvekar : ...म्हणून विधानसभा अध्यक्षांना करावी लागणार 'डबल' ड्यूटी!

तसेच, ''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात करावाई करावी. तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाट्या लावण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल.'' असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

MNS Karad
Supriya Sule : ''...त्यामुळे 'राष्ट्रवादी' कोणाची हे वेगळं सांगायची गरज नाही'' ; सुप्रिया सुळेंचे विधान!

मनसेच्या या निवेदन देवून केलेल्या मागणीमुळे आता ग्रामीण भागातही मराठी पाट्याचा मुद्दा मनसे उचलून धरू लागली आहे. या मागणीला व्यापारी कसे प्रतिसाद देतात आणि मनसे काय भूमिका घेते याकडे प्रशासनासह लोकांचे लक्ष लागून आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com