Rahul Narvekar : ...म्हणून विधानसभा अध्यक्षांना करावी लागणार 'डबल' ड्यूटी!

Winter Session : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण? ज्यामुळे राहुल नार्वेकरांची चांगलीच तारांबळ होणार आहे.
Rahul Narvekar
Rahul Narvekarsarkarnama
Published on
Updated on

MLA Disqualification : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. दरम्यान या कालावधीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना अधिवेशाच्या कामाजाव्यतिरिक्त अन्य एका महत्त्वपूर्ण कामासाठी अधिकचा वेळ द्यावा लागणार आहे.

राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रताप्रकरणी दिवसभराचं अधिवेशाचं कामकाज संपल्यानंतर सायंकाळी सुनावणी घ्यावी लागणार आहे. सकाळच्या सत्रात अधिवेशनाचं काम चालणार असल्याने, विधासभा अध्यक्षांना हे कामकाज संपल्यानंतर म्हणजेच सायंकाळी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी लागणार असल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Narvekar
Shiv Sena MLA Disqualification : आता शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी ... 

कारण, आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नार्वेकरांची अधिवेशन काळात चांगलीच कसरत होणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आले असून, शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rahul Narvekar
Bhujbal Vs Vikhe : ''...तर राजीनामा द्यायला मी तयार''; राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्यावर भुजबळांचं मोठं विधान!

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये दोन्ही गटांना आपली साक्ष पुरावे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र, शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे हे पुरावे सादर करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता. आणि त्यानंतर 24 नोव्हेंबरला साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे.

Rahul Narvekar
Ravikatan Tupkar : रविकांत तुपकरांनी दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले 'सरकारने शब्द पाळला नाही तर... '

आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार दीपक केसरकर, उदय सामंत, दिलीप लांडे, योगेश कदम, भरत गोगावले आणि खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com