Mahayuti Leader Meeting
Mahayuti Leader MeetingSarkarnama

Mohite Patil Vs Nimbalkar : मोहिते पाटलांच्या शक्तिप्रदर्शनाला निंबाळकरांची ‘टशन’; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आमदारांची बैठक

Loksabha Election 2024 : गिरमे यांच्यानंतर खासदार निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांची भेट घेतली होती. शिंदे यांची भेट घेऊन निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना एकप्रकारे आव्हानच दिल्याचे बोलले जाते.

Solapur, 18 March : मोहिते पाटील यांनी रविवारी ‘शिवरत्न’वर शक्तिप्रदर्शन करत भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, सायंकाळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मोहिते पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टेंभुर्णीत आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महायुतीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर या दोन्ही गटांत जोरदार धुमशान सुरू आहे.

मोहिते पाटील (Mohite Patil) हे अकलूजमध्ये शक्तिप्रदर्शन करत असताना खासदार निंबाळकर हे अकलूजपासून हाकेच्या अंतरावर असलेले माळीनगर येथील सासवड शुगरचे चेअरमन राजेंद्र गिरमे (Rajendra Girme) यांच्याशी चर्चा करत होते. गिरमे हे मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासोबत माणचे आमदार आणि सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे उपस्थित होते. म्हणजे मोहिते पाटील हे विरोधात मोट बांधत असताना निंबाळकर हे त्यांच्या विरोधकांशी चर्चा करत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahayuti Leader Meeting
Mahavikas Aghadi : मोहिते पाटलांशी चर्चा केलेले जयंत पाटील पवारांना भेटले...

गिरमे यांच्यानंतर खासदार निंबाळकर (Ramjitshinh Naik Nimbalkar) यांनी मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांची भेट घेतली होती. शिंदे यांची भेट घेऊन निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना एकप्रकारे आव्हानच दिल्याचे बोलले जाते. कारण, मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांच्यातील सख्य सर्व जिल्ह्याला माहिती आहे.

दरम्यान, निंबाळकर यांनी आज करमाळ्याचे अपक्ष आमदार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय शिंदे यांच्या टेंभुर्णीजवळील फार्म हाऊसवर महायुतीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यात बैठकीला बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजीबापू पाटील आणि जयकुमार गोरे उपस्थित राहतील. फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे निंबाळकरांचे कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत, त्यामुळे ते बैठकीला येणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

Mahayuti Leader Meeting
Shrinivas Pawar on Ajit Pawar : सख्ख्या भावाचा अजितदादांवर हल्लाबोल; ‘....त्यासारखा नालायकपणा नाही’

माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची खरी अडचण आहे. कारण मोहिते पाटील यांना नाराज करून त्यांना चालणार नाही. दुसरीकडे पक्षाचा आदेशही पाळावा लागणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या फॉर्म हाऊसवर जाणं आणि न जाणंही सातपुते यांची डोकेदुखी वाढवणारं आहे. दरम्यान, या बैठकीला बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजीबापू पाटील आणि जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, कल्याणराव काळे उपस्थित आहेत.

R

Mahayuti Leader Meeting
Raju Shetty News : ठाकरे गटाच्या 'स्वाभिमाना'ची शेट्टींना धास्ती, मतं हवीत पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com