Mahavikas Aghadi : मोहिते पाटलांशी चर्चा केलेले जयंत पाटील पवारांना भेटले...

Jayant Patil Meet Sharad Pawar : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची रविवारी अकलूजमध्ये येऊन भेट घेतलेले शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काल कोणाशी चर्चा झाली, याची माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली.
Jayant Patil-Sharad Pawar
Jayant Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 18 March : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची रविवारी अकलूजमध्ये येऊन भेट घेतलेले शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काल कोणाशी चर्चा झाली, याची माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली. तसेच, माढा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शेकापला मिळावा. माढ्यातून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्याची जागा शेकापला द्यावी, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शरद पवारांकडे केली आहे. माढ्यातून आम्ही (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देण्यात यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनिकेत देशमुख यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. शरद पवार यांनी माढ्यातून (Madha) राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना आग्रह केला असतानाच शेकापकडून त्याच मतदारसंघाची मागणी झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी जो उमेदवार ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil-Sharad Pawar
Shrinivas Pawar on Ajit Pawar : सख्ख्या भावाचा अजितदादांवर हल्लाबोल; ‘....त्यासारखा नालायकपणा नाही’

जयंत पाटील म्हणाले, आज आमच्यामध्ये कोकणाबाबत चर्चा झाली. रायगड आणि इतर जागांचा त्या समावेश होता. मी काल माढा लोकसभा मतदारसंघात गेलो होतो. त्याबाबत कुणाशी चर्चा झाली, त्याबाबतची माहिती शरद पवार यांना दिली आहे. महाविकास आघाडीचे नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. आमचं यापूर्वी नुकसान झालं आहे. पण यापुढे तरी ते होऊ नये, असे आमचे प्रयत्न आहेत.

आम्ही अजूनही इंडिया आघाडीसोबत आहे. मी महाविकास आघाडीसोबत असताना आमचं नुकसान झालं, ज्यांनी नुकसान केलं ते निघून गेले, पण त्यावर आता बोलायचं नाही, असे सांगून त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला.

जयंत पाटील म्हणाले, मी काल माढा मतदारसंघात गेलो होतो. मी गेल्यामुळे सर्वजण तिकडे आले. ती बैठक ठरवून केलेली नव्हती. गप्पागोष्टी झाल्या. भाजपच्या उमेदवारीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वतः मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्यानंतर गिरीश महाजनही तिकडे गेले होते. ते तडजोडी चांगल्या करतात, त्यांचा त्यात हातखंडा आहे. आमची मागणी एवढीच आहे की, माढा लोकसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला द्यावा

Jayant Patil-Sharad Pawar
Kolhapur Loksabha News : महाविकास आघाडीतील मोठे नेते लवकरच भाजपमध्ये; धनंजय महाडिकांनी दिले संकेत

माढ्यातून मी निवडणूक लढवणार आहे, असे महादेव जानकर मला कधी बोलले नाहीत. पण, मला वाटत नाही की गणपतराव देशमुख यांच्या नातवाला ते विरोध करतील. ही जागा आम्हाला महाविकास आघाडीतून पाहिजे, अशी आम्ही मागणी केली आहे.

R

Jayant Patil-Sharad Pawar
Girish Mahajan on Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या उमेदवारीवर महाजनांचे सूचक वक्तव्य; त्यांचे तिकीट नाकारण्याचा विषयच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com