Ramesh Kadam News : तुरुंगातून बाहेर आलेल्या रमेश कदमांनी जाहीर केली भूमिका; लोकसभेला कुणाला पाठिंबा?

Solapur Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेत महायुती की महाविकास आघाडी? याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
Ramesh Kadam
Ramesh Kadamsarkarnama

Solapur Political News : सोलापूर लोकसभा निवडणुकीत चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात स्थानिक विरुद्ध उपरे, असा वाद रंगला आहे. तर, सोलापुरात राजकीय उलथापालथही जोरदार होत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे, मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर रमेश कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) उपस्थित होते. यासह मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या उत्तर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. रमेश कदम 2014 साली राष्ट्रवादीकडून मोहोळ मतदारसंघातून निवडून आले होते. 'एमआयएम'नं कदम यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. ही चर्चा पुढं झाली नाही. पण, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मोहोळवासीयांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असं आवाहन करत रमेश कदम यांनी भूमिका स्पष्ट केली.

रमेश कदम म्हणाले, "मोहोळ विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाचे प्रश्न रखडले आहेत. त्यात शिरापूर उपसा, आष्टी उपसा सिंचन योजना, विविध रस्ते यासह अन्य विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्तेची गरज असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. या सर्व रखडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची गरज आहे."

Ramesh Kadam
Devendra Fadnavis News : अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांचा पुष्पगुच्छ फडणवीसांनी स्वीकारला नाही

या वेळी तानाजी सावंत यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. "आम्ही विस्थापित आहोत, प्रस्थापित नाही. विस्थापितांना काय वंचित ठेवण्याचं काम प्रस्थापितांनी केलं. गेल्या साठ वर्षांपासून काँग्रेसनं केवळ संस्थानं निर्माण केली. पंतप्रधान मोदी यांना संपूर्ण जग नेता मानते. उमेदवार कोण आहे, हे आम्हाला माहिती नाही. देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे," असं प्रतिपादन तानाजी सावंत यांनी केलं.

रमेश कदम कोण आहेत?

2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर रमेश कदम मोहोळ मतदासंघातून निवडून आले होते. आमदार झाल्यानंतर मागेल त्याला टँकर, शेततळे, मागेल तिथे रस्ता दिल्यानं रमेश कदम लोकप्रियतेच्या शिखरावर गेले होते. पण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

ऑगस्ट 2023 मध्ये जामिनावर रमेश कदम बाहेर आले आहेत. मोहोळमध्ये रमेश कदम यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं होतं. ही क्रेझ पाहून अनेक राजकीय पक्षांनी त्यांना ऑफर दिली होती. पण, कदमांनी सर्वांना होल्डवर ठेवलं होतं. यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी कदम यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, मोहोळ तालुक्यातून महाविकास आघाडीला मते मिळण्याची अपेक्षा होती. पण, मोहोळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत. आता रमेश कदम यांनी पाठिंबा दर्शवल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे, तर महाविकास आघाडीला आणखी कसरत करावी लागणार आहे.

R

Ramesh Kadam
Ranjeetsinha Naik-Nimbalkar : निंबाळकरांनी 50 वर्षांची हिस्ट्रीच काढली; धैर्यशील अन् रणजितसिंह मोहिते-पाटलांवर वार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com