विधान परिषद अभी बाकी है...त्यानंतर बरंच काही होईल; महाडिकांचा कुणाला इशारा?

धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadiksarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : राज्यातील सत्तांतराची स्थिती सर्वांसमोर आहे. विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने आहे. राज्यसभा तो झाकी है, विधान परिषद अभी बाकी है, त्यानंतर बरकच काही होईल, असा सूचक इशारा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिला आहे.

राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर येथे ते आले होते. त्यावेळी भाजप (BJP) पदाधिकार्‍यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी महाडिकांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाडिक म्हणाले, मी सर्व आमदारांचे आभार मानणार आहे. अपक्षांचे मतदान गुप्त होते. त्यामुळे सर्वांचाच सन्मान झाला पाहिजे. भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, मुक्ताताई टिळक यांची प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले. त्यामुळे त्यांचे मी प्रथम आभार मानले.

Dhananjay Mahadik
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनिष्ठच, आघाडीचे खरे फुटीर शोधा : अनिल पाटील

या निवडणुकीत एक-एक आमदारांचे मत महत्वाचे होते. आम्हाला 13 ते 14 मतांची संख्या कमी होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या कौशल्याने ही बेरीज करून भाजपचे तीनही उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी घोडेबाजारासह अन्य केलेली वक्तव्ये त्यांना नडली. अपक्ष आमदार व घटक पक्षांच्या आमदारांवरही झालेले आरोप व त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे आमदार त्रस्त झाले आहेत, ते निकालानंतर जगजाहीर आहे.

Dhananjay Mahadik
‘मोहोळचा पुढचा आमदार भाजपचाच’ : महाडिकांच्या विजयानंतर पक्षनेत्याने केला दावा!

यामुळे महाविकास आघाडीच्या पदरी अपयश आले. माझ्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे निश्‍चितपणे बदलली आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थामध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजला आहे, तो आम्हाला नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोंदी (Narendra Modi), देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आमच्या सोबत आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com