खासदार निंबाळकर, आमदार गोरेंचे ठराव न्यायालयातही पात्रच

याचिकेवर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत उच्च न्यायालयाने याचिका कर्त्याची मागणी फेटाळून लावत विभागीय सहनिबंधकांनी दिलेला निर्णय कायम ठेवला.
खासदार निंबाळकर, आमदार गोरेंचे ठराव न्यायालयातही पात्रच
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पाणी पुरवठा संस्थेतील ठराव विभागीय सहनिबंधकांनी पात्र ठरवून त्यांचा मतदारयादीत समावेश केला होता. या विरोधात माण तालुक्यातील जालिंदर खरात यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हे ठराव अपात्र करावे, अशी मागणी केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांचा निर्णय अंतिम ठेवला. त्यामुळे खासदार व आमदारांचे दोन्ही ठराव पात्र राहिले आहेत. तसेच याचिकाकर्त्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

त्यामुळे आता जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्दीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सोमवारी यादी प्रसिध्द केली जाणार असल्याचे विभागीय सहनिबंधकांनी सांगितले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर या यादीवर हरकती व आक्षेप मागविले होते. यावेळी पाणीपुरवठा संस्थांतून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते.

खासदार निंबाळकर, आमदार गोरेंचे ठराव न्यायालयातही पात्रच
नाना पटोले खरेच मुख्यमंत्र्यांनी बोलणार नाहीत?

त्यास खासदार व आमदार यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या समोर सुनावणी होऊन त्यांनी दोन्ही ठराव पात्र ठरविले होते. त्यामुळे अंतिम यादी प्रसिध्द होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण त्याच्या आदल्या दिवशीच माण तालुक्यातील जालिंदर खरात यांनी हे दोन्ही ठराव अपात्र ठरवावे, अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल होईपर्यंत अंतिम मतदारयादी प्रसिध्द करु नये, अशी सूचना न्यायालयाने केली होती. त्यामुळे अंतिम यादी प्रसिध्द झाली नव्हती.

त्याच दरम्यान, याचिकेवर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका कर्त्याची मागणी फेटाळून लावत विभागीय सहनिबंधकांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पाणी पुरवठा मतदारसंघातील ठराव पात्रच राहिले आहेत. आमदार गोरे व खासदार निंबाळकर यांच्या बाजूने ॲड. विजय पाटील,ॲड. विश्वजीत सावंत, ॲड. अरुण खोत, ॲड. सिध्दार्थ करपे यांनी युक्तीवाद केला. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्दीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सोमवारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणार आहेत. त्यानंतर दहा दिवसांनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com