MP Sanjay Patil : संजय पाटलांचा महापालिकेतील ठेकेदारीवर संताप; म्हणाले, 'खासदार,आमदारांचा फोन...'

Sangli, Miraj-Kupwad Municipal Corporation: खासदार संजय पाटीलांची अधिकाऱ्यांना तंबी
MP Sanjay Patil
MP Sanjay Patil Sarkarnama
Published on
Updated on

अनिल कदम

Sangli News: 'महापालिकेत आता नगरसेवक नसल्याने कोणाला घाबरण्याचे काम नाही, ठेकेदारांची साखळी मोडून दर्जेदार कामे करायला हवीत, अशी कामे करताना आता कोणत्याही खासदार, आमदारांकडून फोन आला तरी त्यांचे ऐकू नये', अशी सूचनाच खासदार संजय पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिली.

महापालिकेत खासदार पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, वैभव साबळे, राहुल रोकडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत पाटील यांनी महापालिकेच्या प्रतिमेवर बोट ठेवले. साखळी करून ठेकेदारांची खाबूगिरी फोफावल्याची टीका त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Sanjay Patil
Ramraje Vs Ranjitsinh Naik : 'खासदार निंबाळकर हे तर आमदार गोरेंचे PA'; रामराजेंनी साधला निशाणा!

खासदार पाटील म्हणाले, 'महापालिकेत आता प्रशासकराज आहे. त्यामुळे मुक्तपणे काम करण्याची संधी आहे. महापालिकेवर नागरिकांचा विश्वास उरला नाही. ही प्रतिमा बदलण्याची आता संधी आहे. त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता चांगली दर्जेदार कामे करण्यात यावीत, रस्ते, गटारी, ड्रेनेज यासह लोकांच्या हिताची कामे तातडीने करायला हवीत. ठेकेदारी व नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबल्याने कमी खर्चात चांगली दर्जेदार कामे करता येणे शक्य आहे.'

महापालिकेच्या कामांबाबत नाराजी

रेंगाळलेले ड्रेनेजचे काम, मोकाट कुत्र्यांचे मंदगतीने सुरु असलेले लसीकरण, महापालिकेच्या दवाखान्यातील कमी रूग्णसंख्या, आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले कमी प्रस्ताव, शहरातील मुख्य रस्त्यांची कामे, हे सांगत खासदार पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत सुधारणा करण्याची सूचना दिली.

आयुक्तांनी शिस्त लावावी

शहरातील मुख्य रस्ते, चौक अतिक्रमण मुक्त करायला हवेत. आयुक्तांच्या हातीच आता अधिकार असल्याने त्यांनी त्यांची ताकद दाखवून शहराला शिस्त लावायची, असे खासदार पाटील म्हणाले. यावर आयुक्त म्हणाले, आम्ही अतिक्रमण हटविण्याबाबत नियोजन केले आहे. लवकरच त्याची सुरुवात तिन्ही शहरात होईल.

आयुक्तांकडून दिले प्रस्ताव

महापालिका आयुक्त सुनिल पवार यांनी केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या काळी खण सुशोभिकरणाचा प्रस्ताव दिला. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे गेलेला हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजित जागेत महापालिकेची इमारत उभारण्यासाठी 48 कोटींचा खर्च येणार आहे. या निधीसह कृषी विभागाची काही जागा महापालिकेला देण्याबाबत तोडगा काढावा अशी मागणी केली.

(Edited By : Ganesh Thombare)

MP Sanjay Patil
Kolhapur Politics : भाजपमध्ये नवख्यांना मोदी लवकर कळले; जुन्या-नव्यात चढाओढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com