Thane Municipal : बॅनरबाजीला आला ऊत ; महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली...

Banner : मुख्यालयासमोरील बॅनरवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्रे असल्याने कारवाई टाळल्याचा आरोप
Banner
Banner Sarkarnama
Published on
Updated on

- पंकज रोडेकर

Thane Municipal : बॅनरबाजीतून शहराचे विद्रूपीकरण केल्यास दंड आकारण्याबरोबर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. याशिवाय दर बुधवारी फलक सफाई मोहीम हाती घेतली जाईल, असे त्यांनी म्हटले होते. असे असतानाही ठाणे शहरातच नाहीतर महापालिका मुख्यालयासमोर बॅनरबाजीला अक्षरशः ऊत आला आहे.

यातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. बहुतांशी बॅनरवर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची छायाचित्रे असल्याने कारवाई टाळून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे चित्र ठाणे येथे पाहण्यास मिळत आहे. पण शहर विद्रुपीकरणावर फक्त फलक काढण्याची कारवाई केली जाईल आणि ती कारवाई बुधवारी होईल की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Banner
Sanjay Raut : जरांगे-पाटलांचा राजकीय वापर; पंतप्रधान मोदी सावरकरांना विसरले..!

तसेच दंड किंवा गुन्हे दाखल होतील की नाही हे सांगणे तसे कठीणच असल्याचे शहरातील बॅनरवरील छायाचित्रांवरून दिसत आहे. संपूर्ण देश सध्या राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने राममय झाला आहे. ठाण्यातही सध्या तसेच वातावरण दिसत आहे. परंतु ठाण्यात यानिमित्ताने पुन्हा एकदा बॅनरबाजीला ऊत आल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे स्वच्छ ठाण्याचा नारा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बॅनरबाजीने पुन्हा एकदा शहरातील महत्वाचे चौक, रस्ते, अगदी नव्याने रंग मारण्यात आलेल्या मेट्रोच्या पिलरवर देखील पुन्हा बॅनरबाजीतून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयाच्या समोरच जेथून आयुक्त व पालिकेचे इतर पदाधिकारी रोजच्या रोज ये - जा करीत असतात.

त्या परिसराला देखील बॅनरबाजीचा विळखा पडला आहे. परंतु या बॅनरबाजीकडे महापालिका प्रशासन जाणून बुजून कानाडोळा करते का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

ही आहेत बॅनरबाजीची प्रमुख ठिकाणे...

महापालिका मुख्यालय, तेथील सर्कल, मासुंदा तलाव, नितीन कंपनी, कॅसलमिल नाका चौक, जांभळी नाका चिंतामणी चौक.

(Edited by Amol Sutar)

Banner
MP Amol Kolhe : विद्यमान आमदार दुरावल्याने अमोल कोल्हेंची माजी आमदारांकडे धाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com