Sharad Pawar : 'परिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरच करेल...'; शरद पवारांनी सांगितली वैशिष्ट्ये

Sharad Pawar On PM Narendra Modi : केंद्र सरकारकडे विचार नाही म्हणून त्यांना कायदा हातात घ्यावा लागतो, खासदार शरद पवार यांची जोरदार टीका
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : 'युती सरकारला पुरोगामी विचारांमध्ये आस्था नाही. सत्तेचा वापर केवळ राजकारणासाठी सुरू आहे. विरोधात बोलणाऱ्यांवर ईडीचा धाक ठेवून तुरुंगात टाकतात, पण कोल्हापूरच्या जनतेने नेहमीच पुरोगामी विचारांना साथ दिली. राजर्षी शाहू महाराज यांचा संदेश याच नगरीतून देशभर पोहोचला. ही परिवर्तनाची भूमी असून, आताही देशातील परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून व्हावी,' असे आवाहन ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांनी आज केले. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारकडे विचार नाही म्हणून त्यांना कायदा हातात घ्यावा लागतो. पुण्यात ‘निर्भय बनो’ या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांवरही हल्ला केला. विचारांचा विरोध विचारांनी केला पाहिजे. यासाठी समतेच्या विचारांवर विश्वास असणाऱ्यांनी संघर्ष उभारला पाहिजे. हा संघर्ष केवळ निवडणुकीपुरता नाही तर तो सर्व पातळ्यांवर करावा लागेल, असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Sharad Pawar News : भेट पवार-शाहू महाराजांची, टेन्शन वाढले इच्छुकांचे !

"कोल्हापूर नेहमीच परिवर्तनाची भूमी राहिली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा समतेचा विचार याच भूमीतून देशभर गेला. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करावा, हे देशाला दाखवून दिले. अशा कोल्हापूरच्या भूमीतून देशातील परिवर्तनाची सुरुवात व्हावी," असे पवार यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशातील वातावरण दूषित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेली घटना कोणी मोडू शकणार नाही, पण त्यातून पळवाटा शोधल्या जातात. पक्षांतरबंदी कायद्यातून पळवाट काढूनच राज्यात सत्ताबदल झाला. 75 वर्षांत कधीही महाराष्ट्र इतका अस्थिर नव्हता, तो आता झाला आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, "संतांनी समतेचा विचार दिला, पण जो त्रास संतांना झाला तोच पानसरेंनाही झाला. पानसरे यांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला म्हणूनच त्यांची हत्या झाली. देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत आहे. तो आपण हाणून पाडला पाहिजे."

(Edited By-Ganesh Thombare)

R

Sharad Pawar
Sangali Congress News : विशाल पाटलांच्या उमेदवारीचा मुंबईत फैसला; काँग्रेसची गुरुवारी बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com