Supriya Sule : 'रुसवे फुगवे धरायला, 'हे' तुमचे घर...; सुप्रिया सुळेंचे महायुतीतील नाराजीनाट्यावर 'शालजोडे'

Clashes In Mahayuti On Guardian Minister Post : राज्यातील महायुती सरकारमध्ये सध्या पालकमंत्रीपदावरून नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यामध्ये नाराजी आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील महायुती सरकारमध्ये झालेल्या पालकमंत्रीनियुक्तीवरून मोठे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावर हे पालकमंत्री पदावरून तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाना साधला आहे. त्यांनी, मंत्र्यांना रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही. दोन महिने झाले सरकार सत्तेत येऊन आता या सगळ्या गोष्टींची उबग आल्याचे म्हटले आहे. त्या आज (ता.21) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

राज्यातील पालकमंत्रीपदांच्या नियुक्त्यांवरून महायुतीतील पक्षांमधील नेत्यांमध्ये खदखद समोर येत आहे. नाशिक, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खदखद उघड झाली आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळले असतानाच सुळे यांनी महायुतीला हात जोडत शालजोडे मारले आहेत.

लोकांनी महायुतीला कशासाठी निवडून दिलं आहे? आप-आपसात भांडण करण्यासाठी की लोकांच्या सेवेसाठी? तुम्हाला पालकमंत्री पदावरून भाडंण करण्यासाठी निवडून दिलं नसून, राज्यात बदल घडवण्यासाठी बहुमत दिलं आहे. पण महायुती सत्तेत येऊन दोन महिने झाले आहेत. आता पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य रंगले आहे. आता मला याची उबग आली असून कोण कुठला पालकमंत्री? कोणतं डिपार्टमेंट आणि रूसवेफुगवे केले जात आहेत. आता बस हे तुमचे घर नाही. तुम्हाला देशाची आणि राज्याची सेवा करायची आहे. पण आता पालकमंत्र्यांच्या निवडीला रातोरात स्थगिती दिली जाते, यावरून देखील सुळे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Supriya Sule on Ajitdada : अजितदादांसोबतच्या संबंधावर सुप्रिया सुळेंचे प्रथमच मोठे भाष्य; ‘मी अजित पवारांशी बोलते; पण...’

राज्य सरकारने आता कामाला लागायला हवे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे. याचा विचार करून सरकारने कामाला लागायला हवं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर आणि जनतेसमोर मोठे प्रश्न असून यावर राज्य सरकार चर्चाच करत नाही. उलट हे लोक आपसात भांडण करत असल्याची टीका देखील सुळे यांनी केली आहे.

पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला, हे तुमचे घर नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी या मुद्द्याला बगल देण्यासाठी पहाटेच्या शपथविधी चर्चेत आणला जातोय असाही दावा सुळे यांनी केलाय.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Supriya Sule on Ajitdada : अजितदादांसोबतच्या संबंधावर सुप्रिया सुळेंचे प्रथमच मोठे भाष्य; ‘मी अजित पवारांशी बोलते; पण...’

तर महाराष्ट्रात गुंतणूक वाढावी, धोरणात्मक निर्णय घेतले जावेत. हार्वेस्टर प्रकरणाची चौकशी व्हावी, पिकविम्याचा निर्णय व्हावा यासह लाडक्या बहिणींच्या अडीच 2100 की 3000 हजार देणार? असे प्रश्न उपस्थित केले. तसेच हे सरकार आपलं सरकार गतीमान सरकार अशी टॅगलाइन लावतं, मग आमचे रस्ते गतीमान का होत नाहीत? असेही सवाल उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com