Bhor MLA Issue : 'अजितदादा, तुमचा आमदार होऊ न देण्याचा डायलॉग ‘भोर’मध्ये खरा करून दाखवा'; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची प्रेमळ मागणी

NCP activists Request To Ajit Pawar : 'मी जर एकदा ठरवलं, एखाद्याला आमदार करायचं नाय; तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही’
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Khed-Shivapur News : पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. साताऱ्याकडे जाताना खेड शिवापूर टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी पवारांकडे अजबच मागणी केली. ‘अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय. मी जर एकदा ठरवलं, एखाद्याला आमदार करायचं नाय; तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही’ दादा तुमचा हा प्रसिद्ध डायलॉग भोर-वेल्हे-मुळशीत खरा करून दाखवा,’ अशी विनंती भोर-वेल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. (Ajitdada, make that dialogue of yours come true in 'Bhor': NCP activists demand)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार खरंच मनावर घेणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे निवडून येतात. मात्र, नव्या समीकरणामुळे अजित पवार गटाचा उमेदवार या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो.

Ajit Pawar
Ajit Pawar Satara Tour : अजित पवारांचे सातारच्या सीमेवर जंगी स्वागत; गर्दी पाहून धनंजय मुंडे गाडीतच बसले

कोल्हापुरात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा आहे. पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना होताना पवार यांच्या रॅलीचे भोर-वेल्हे आणि हवेली तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे-सातारा मार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावर जंगी स्वागत केले. या वेळी रणजित शिवतारे, भालचंद्र जगताप, दादा डिंबळे, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, गणेश खुटवड, अभयसिंह कोंडे, राजेंद्र पवार आणि तीनही तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

Ajit Pawar
Cabinet Expansion News : मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्रिपदाचे वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार; सुनील तटकरेंची माहिती

खेड शिवापूर टोल नाक्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी म्युझिक सिस्टिम लावण्यात आली होती. त्यावर ‘अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय. मी जर एकदा ठरवलं, एखाद्याला आमदार करायचं नाय; तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही,’ हा डायलॉग वाजविण्यात येत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जेव्हा टोल नाक्यावर एन्ट्री झाली. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘दादा तुमचा हा डायलॉग भोर-वेल्हे-मुळशी विधानसभा मतदारसंघात खरा करा,’ अशी विनंती केली.

Ajit Pawar
Munde On Ajit Pawar CM Post : अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार...? धनंजय मुंडेंनीच वर्षच सांगितले...

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची ही विनंती म्हणजे एका अर्थाने भोर-वेल्हे-मुळशी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा आमदार निवडून आणावा, अशी मागणीच कार्यकर्त्यांनी पवारांकडे केली आहे. आता अजित पवार कार्यकर्त्यांच्या विनंतीचा किती गांभीर्याने विचार करतात, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com