

Kolhapur News: सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा यंदा महापालिकेच्या निवडणुकीत पैसेवालेच उमेदवार रिंगणात आहेत. स्वतः जवळ असलेली आर्थिक रसद याचा विचार करून उमेदवारांना देण्यात आलेल्या उमेदवारीमुळे शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीची बनवते. कोल्हापूर महानगरपालिकेत जवळपास शंभरहून अधिक उमेदवार हे कोट्याधीश आहेत. करोडपती असणारे उमेदवार हे एकमेकांना भिडणार आहेत.
शपथपत्रात दिलेल्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या माहितीवरून कोट्यधीश असलेले १०० हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे दिसते. त्यात २० कोटींहून अधिक मालमत्ता असलेले सहा उमेदवार आहेत. उमेदवारांनी सादर कराव्या लागणाऱ्या शपथपत्रात जंगम, स्थावर मालमत्ता, कर्ज, शिक्षण, गुन्ह्यातील शिक्षा वा होऊ शकेल अशी प्रलंबित गुन्ह्यांची माहिती द्यावी लागते, निवडणूक विभागाला ती प्रसिद्ध करावी लागते. आज ती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली.
२० प्रभागांमधील काही जागा अपवाद वगळता प्रत्येक जागेसाठी एक तरी करोडपती रिंगणात आहे. काही जागांवर दोन, तीनपर्यंत ही संख्या आहे. अनेकांची जंगम मालमत्ता कमी आहे, तर स्थावर मालमत्ता कोट्यवधींची आहे. एक ते १० कोटींपर्यंतची मालमत्ता असलेले ८५ उमेदवार विविध जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यातील काही माजी नगरसेवकांच्या पत्नी आहेत, मुले आहेत. काही व्यावसायिकांचा समावेशही आहे. या ताकदीशिवाय निवडणूक शक्य नसल्याचे मत सार्वत्रिक आहे. या उमेदवारांमुळेच रंगतही येते, असाही काही मतदारांचा मतप्रवाह आहे.
प्रभाग क्रमांक नऊ ड मध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेले कॉग्रेसचे उमेदवार राहुल माने यांची मालमत्ता ३४ कोटींवर तर त्यांच्यासमोर लढणारे शिवसेनेचे शारंगधर देशमुख यांची मालमत्ता २० कोटींवर आहे. तर १४-क मधील शिवसेनेचे प्रकाश नाईकनवरे यांची मालमत्ता १० कोटींवर तर कॉंग्रेसचे उमेदवार अमर समर्थ यांची मालमत्ता ११ कोटींवर आहे. याबरोबरच १३ क मधील कॉंग्रेसचे उमेदवार प्रवीण हरिदास सोनवणे यांची ३४ कोटींवर मालमत्ता आहे. ११-अ मधील शिवसेनेचे उमेदवार सत्यजित जाधव यांची मालमत्ता २५ कोटींवर आहे.
पीएच.डी.धारक, इंजिनिअर, आर्किटेक्ट, वकीलही रिंगणात उमेदवारी अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता नमूद करावी लागते. त्याप्रमाणे अनेक उमेदवार दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले, काही पदवीचे शिक्षण अर्धवट घेतलेले दिसून येतात. पदवीधर, पदव्युत्तर पदवी घेतलेले आयटीआय, डीएड, बीएड, बिझनेस मॅनेजमेंटची पदविका घेतलेलेही दिसतात. याशिवाय कॉम्प्युटर, आयटी, सिव्हिल इंजिनिअर, एलएलबी, डॉक्टर, पीएच.डी. धारकही निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.