Rajendra Raut : माझी अख्खी इस्टेट पार्टीसाठी जाऊ द्या; मी त्यांच्या बापालाही भीत नाही : राजेंद्र राऊतांचे विरोधकांना चॅलेंज

Zilla Parishad Election 2026 : माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देत वैयक्तिक संपत्तीपेक्षा पक्ष मोठा असल्याचे ठाम विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Rajendra Raut
Rajendra Raut Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 January : छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांचं अनुकरण करत मी राजकारण करतो. महाराजांनी एकही किल्ला स्वतःची प्रॉपर्टी मानला नाही. त्याच पद्धतीने मुलगा रणजितला वीस एकर जमीन आणि रणधीरला छोटा-मोठा व्यवसाय सोडलं तर अख्खी इस्टेट पार्टीसाठी जाऊ द्या. मी त्यांच्या बापालाही भीत नाही, अशा शब्दांत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांना चॅलेंज दिले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वीभूमीवर माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी निवडणूक खर्चाबाबत भाष्य केले. विरोधी गटातील लोक उमेदवाला तू किती खर्च करणार?, असं विचारतात. आपल्याकडे साडेतीनशे लोक मुलाखतीसाठी आले होते, त्यातील किती जणांना मी खर्चाबाबत विचारलं, अस सवालही राऊतांनी केला.

राऊत म्हणाले, माझा कुठलाच स्वार्थ नाही. मी पोराला आणि भावाला बाहेर काढलं आहे. पण पार्टी सांभाळण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार मी शेवटच्या क्षणी नानाला तिकिट देण्याचा निर्णय घेतला. मला आणि माझ्या कुटुंबाला विनाकारण टार्गेट करण्यात आले होते. त्यांच्या मला वेदना होत होत्या. त्यातून मी घरात कोणालाही तिकिट दिलं नाही. त्यामुळे तुम्ही जिल्हा परिषद (zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीत रिझल्ट चांगला द्या. बाकी सगळं माझ्यावर सोपवा.

कोणाची नाराजी असेल तर मला येऊन बोला. पण, एकमेकांना बोलू नका. आपले कार्यकर्ते नाराज होतील, असे कोणीही बोलू नये. विधानसभेला आपल्याला ह्याचा गोष्टी अंगलट आल्या आहेत. इतर पक्षातून प्रवेश होत असतात, त्यामुळे नाराज होऊ नका. गावागावात असे प्रकार होणार आहेत. ही बार्शी आहे. अशा गोष्टींचाच विरोधकांकडून फायदा घेण्यात आलेला आहे. त्यांची गुणवत्ता काय आहे? असा सवाल राऊतांनी केला.

Rajendra Raut
Akola: काठावरच्या भाजपला शरद पवारांचा पाठिंबा; अकोल्यात सत्तेचा मार्ग मोकळा! महापौर अन् उपमहापौरांच्या नावावरही शिक्कामोर्तब

माजी आमदार राऊत म्हणाले, तुमच्यावर विश्वास नाही, असं नाही. पण, पक्षाला काही गोष्टी कराव्या लागतात. ज्या ठिकाणी भाजपमध्ये गटतट आणि वाद आहेत. अशी तालुक्यात जी ५-२५ गावे आहेत, अशा प्रत्येक गावांत राऊत चाळीतील एक निरीक्षक असणार. तो सभागृहात झोपेल आणि मला गावांतील सर्व घडामोडींची माहिती देईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. कोण काय करतंय याचीही दक्षता घेतली जाईल.

याने असं केलं आणि त्याने तसं केलं म्हणत बसू नका. तुमच्याकडं कोणी येणारही नाही. स्पेशल माणूस सभागृहात झोपेल. किंवा पाऊणा रावळा म्हणून येईल. चाळीतील कुणाचे पाव्हणे कुठे आहेत, हे मला चांगलं माहिती आहे. त्याला मी पाठवेन आणि मला फक्त माहिती देत जा, असे सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Rajendra Raut
Shiv Sena Split : शिवसेनेत पुन्हा फूट? पुन्हा बंडाची शक्यता; बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा खासदारांचा दावा

ते म्हणाले, कोणी गडबड करत असेल तर मी शंभर टक्के त्याला फोन करतो आणि सांगतो की तू गडबड करू नको. मला तुझ्याबाबत खराब माहिती यायला लागली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणी गडबड करू नका. ही निवडणूक मी डोळ्यांत तेल घालून लढवत आहे. मी गेल्या चार महिन्यांपासून पाच तासाच्या पुढे झोपलोच नाही. एवढी मेहनत घेण्याचे कारण काय? तर विधानसभेला जो गोंधळ झाला आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून तालुक्याचे नुकसान होत आहे. आता पुन्हा जर नुकसान झालं, तर जिंदगीभर हे नुकसान भरून निघणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com