Pandharpur Corridor : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : ड्रीम प्रोजेक्टबाबत पंढरपूर नगरपालिका घेणार महत्वाचा निर्णय

Devendra Fadnavis Dream Project : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. पंढरपूर नगरपालिकेकडून ९ सप्टेंबरला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 06 Septmber : गेली वर्षभरापासून चर्चेत असलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट पंढरपूर कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पंढरपूर नगरपालिकेकडून कॉरिडॉरला येत्या बुधवारी (ता. ०९ सप्टेंबर) मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

पंढरपूर नगरपालिकेची येत्या बुधवारी (ता. ०९ सप्टेंबर) सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरसोबत गोवा सरकारने भक्त निवास बांधण्यासाठी जागा मागितली असून त्याला मंजुरी देणे, नामसंकीर्तन सभागृहाचे काम करणाऱ्या पूर्वीच्या ठेकेदाराचे थकीत देणी देणे, वाहनतळ बाजार फी वसुलीचा व उद्याने, जलतरण तलाव चालविण्याचा ठेका देण्यास मंजुरी देण्यासह एकूण 28 विषय अजेंड्यावर आहेत.

पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉ. प्रणिती भालके या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या श्री विठ्ठल मंदिर परिसरातून त्यांना मताधिक्य मिळाले होते.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या भागात पंढरपूर विकास आराखडा (पंढरपूर कॉरिडॉर) राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये शेकडो घरे बाधीत होत असून हजारो नागरीक, व्यापारी, छोटे व्यावसायिक विस्थापित होणार आहेत. श्री विठ्ठल मंदिर परिसरातून भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची पिछेहाट झाली होती, त्याचवेळी कॅरिडॉर हा कळीचा मुद्दा ठरला होेता.

Devendra Fadnavis
Fadnavis on Dcc Bank : ‘तुम्ही त्या भानगडीत पडू नका, घरातील नव्या चेहऱ्यांना संधी द्या’: डीसीसी निवडणुकीबाबत माजी संचालकांना फडणवीसांचा सल्ला

शासकीय विकास कामांना विरोध करता येत नसल्याने नगराध्यक्षांना कॅरिडॉर मंजुरीचा विषय सर्वसाधारण सभेत घ्यावा लागला, असे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात येत आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना पुरेशा सोयी सुविधा नाहीत. बहुतांश मोकळ्या जागोवर अतिक्रमणे झाल्याने शहरात वाहने लावण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, त्यामुळे आरोग्य व पार्कींगचा ठेका वादात अडकला होता.

सक्तीच्या वसुलीमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे पूर्वी देण्यात आलेला वसुली ठेका मुदतीपूर्वी रद्द करण्यात आला होता. आता नव्याने ठेका देण्यात येणार आहे, तो मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

या पूर्वी विविध संस्था, मध्य प्रदेश सरकारने नगरपालिकेच्या जागांवर बांधलेली भक्त निवासांची दुरावस्था झाली आहे. विकासकामांसाठी जागा कमी कमी पडत असल्याने अनेक खासगी जागांवर आरक्षण टाकले जाते. करोडो रुपये मोजून खासगी मालमत्ता संपादित केल्या जात असतानाच गोवा सरकारला 60 हजार चौरस फुट जागा भक्त निवास बांधण्यासाठी देण्याचा विषयीही सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर आहे, असे एकूण 28 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis
Raj Thackeray : राज ठाकरेंचा मुलाच्या भूमिकेला पाठिंबा ; पीएम मोदींचा फोटो लावायला सूचवली दुसरी भिंत

42 कोटींचे काम 70 कोटींवर जाऊनही सभागृहाचे काम अपूर्णच

पंढरपूर शहरात नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची मूळ निविदा 42 कोटी 50 लाख रुपयांना विस्टा कोर इन्फ्रा या कंपनीने भरली होती. मंजुरीनंतर त्यांनी कामही सुरू केले होते. पण, नगरपालिकेने विविध कारणे दाखवून त्यांचे काम काढून घेतले होते. ते काम खिलारी कन्स्ट्रक्शन कंपनीस दिले. त्यानंतर या कामासाठी आजपर्यत 70 कोटी रुपये खर्च झाले, तरीही नामसंकीर्तन सभागृहाचे काम अपूर्णच आहे. पूर्वीच्या ठेकेदाराचे काम काढून खिलारींना का दिले, याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com