Murlidhar Jadhav Resignation : मुरलीधर जाधवांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; शिंदे गटाच्या वाटेवर..?

Hatkanangale Shivsena Political News : हातकणंगले तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटामध्ये खळबळ उडाली आहे.
Murlidhar Jadhav
Murlidhar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Hatkanangale News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुख पदावरून मुरलीधर जाधव यांना हटवल्यानंतर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. आज त्यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून जिल्हा प्रमुख पदावर काम करत असलेल्या मुरलीधर जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी मागणी केल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. दरम्यान, मुरलीधर जाधव यांच्या राजीनाम्याने हातकणंगले तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटामध्ये खळबळ उडाली आहे. शिवसैनिक म्हणून मुरलीधर जाधव यांची ओळख होती. (Murlidhar Jadhav Resignation)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uaddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी शेट्टींना विरोध केला होता. त्यानंतर मुरलीधर जाधव यांना तडकाफडकी जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मेळाव्याकडेही मुरलीधर जाधव यांनी पाठ फिरवली होती. उद्योगमंत्री उदय सामंत (uday Samant) यांची भेट मुरलीधर जाधव यांनी घेतल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचा जाधव यांनी आरोप केला होता. दरम्यान, तब्बल दोन महिन्यांनंतर मुरलीधर जाधव यांनी शिवसेनेचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा (Resignation) दिला. येत्या काळात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murlidhar Jadhav
Political News : आईच्या नावावरचे अतिक्रमण भोवले; कोरोचीचे सरपंच झाले अपात्र

नेमके काय म्हणाले राजीनामा पत्रात

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन आजपर्यंत मी गेली ३० - ३५ वर्षे शिवसैनिक (Shivsena) म्हणून इमाने इतबारे काम करत आलो आहे. तसेच 19 वर्षे जिल्हाप्रमुख, 3 वर्षे तालुकाप्रमुख व 5 वर्षे हुपरी शहरप्रमुख पदावर निष्ठेने व पक्षाच्या आदेशाने कार्य केले आहे. आजही नवीन निवड झालेप्रमाणेच मी उमेदीने व जोशाने पक्षाचे काम करत होतो.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे माझे दैवत होते, आजही आहेत व कायमच राहतील. परंतु दि. 4 जानेवारी 2024 रोजी पक्षाने माझ्याबद्दल जो काही निर्णय घेतला व ज्या पद्धतीने निर्णय घेतला, त्यानंतर मी व्यथित झालो आहे. एवढी वर्षे पक्षासाठी हाडाची काडे करून पक्ष - संघटना तळागाळात पोहोचविली. " गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक " ही संकल्पना राबवत सहकार पट्ट्यात शिवसेना रुजविण्यासाठी कष्ट घेतले.

अनेक शिवसैनिकांना आंदोलन - मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था व गावखेड्यातील मानाची पदे मिळवून देण्यासाठी सातत्याने कष्ट घेतले. तसेच पक्षवाढीसाठी रस्त्यावरची लढाई करत प्रसंगी अनेक गुन्हे अंगावर घेतले. त्यामुळे पक्षासाठी इतकं करूनही ज्या पद्धतीने व ज्या लोकांच्या सांगण्यावरून हा निर्णय झाला, त्यामुळे माझ्यासह अनेक शिवसैनिक बंधू- भगिनी, जिल्ह्यातील अनेक सामान्य नागरिक व्यथित झाले आहेत. त्यामुळे मी आज दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी माझ्या शिवसैनिक प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Murlidhar Jadhav
Shivsena Convention : शिवसेनेत आता शिवसैनिकांच्या धर्तीवर ‘शिवदूत’; कोल्हापूरच्या अधिवेशनात होणार घोषणा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com