सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घरी ईडी येते मग सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) घरी ईडी का येत नाही? शरद पवार (Sharad Pawar) जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटतात त्यावेळी नवीन व्यक्तीचे नाव सांगतात आणि त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांची कारवाई होते, असा आरोप गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पतीलाही नोटीस आली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
सुप्रिया सुळे आज सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले. सुळे यांना राज ठाकरे यांच्या आरोपांविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, राज ठाकरे यांना मिळालेली माहिती चुकीची आणि बिनबुडाची आहे. मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण केल्यानंतर माझे पती सदानंद सुळे यांनाही इन्कम टॅक्सची नोटीस आली होती, असा गौप्यस्फोट केला.
सिल्वर ओकवर आलेल्या महिला कामगारांशी संवाद साधायचा आहे
काही दिवसांपूर्वी एसटी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानावर आंदोलन केले होते. यावेळी या सर्व संतप्त कर्मचाऱ्यांना खासदार सुळे एकट्या मोठ्या हिंमतीने सामोऱ्या गेल्या होत्या. या आंदोलनकर्त्यांमध्ये २२ महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मात्र या २२ महिलांशीही आता मला चर्चा करायची आहे. त्यासाठी मी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.
ही परवानगी मिळाली तर मी स्वतःहा चर्चा करेन अन्यथा आमच्या यशस्विनी सामाजिक अभियानाच्या कार्यकर्त्या त्या महिला कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन चर्चा करतील. एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोणी खाऊ, पिऊ घातले, आमच्या घरासमोर आंदोलन करायला कोणी सांगितले? या खोलात न जाता महिला म्हणून त्यांची ही मानसिकता का झाली? त्यांची काय दुख: आहेत? याचा मला शोध घ्यायचा आहे, असे सुळे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.