Sharad Pawar Vs Ajitdada : शरद पवार की अजितदादा...?, भावनाविवश राष्ट्रवादी आमदाराची निवडणूक न लढविण्याचीच मानसिकता

सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे आईच्या सल्ल्यानुसार मी विधानसभेची आगामी २०२४ ची निवडणूक न लढविण्याच्या मानसिकतेत आहे.
NCP MLA  Atul Benke
NCP MLA Atul BenkeSarkarnama

Junnar NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनेक आमदार आणि नेतेमंडळींची राजकीय कोंडी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ द्यावी की शरद पवार यांच्यासोबत उभे राहावे, अशा पेचात राष्ट्रवादीचे आमदार आणि पुढारी आहेत. काही दिवसांपूर्वी तशी भावना कोकणातील चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी बोलून दाखवली हेाती. तशीच व्यथा जुन्नर (जि. पुणे) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार अतुल बेनके यांनीही व्यक्त केली आहे. त्यातूनच त्यांनी विधानसभेची आगामी २०२४ ची निवडणूक न लढविण्याची माझी मानसिकता झाली आहे, असे स्पष्टपणे सांगितले. (My mindset of not contesting upcoming elections : NCP MLA Atul Benke)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्या भूमिकेकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. डेंगी झाल्याने ते रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयातून आल्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर जावे, असे सांगितले. नेतेमंडळींची भूमिका नेमकी उलट होती. त्यानंतर नारायणगावात पत्रकारांशी बोलताना बेनके यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. या वेळी आमदार बेनके भावनाविवश झाले होते.

NCP MLA  Atul Benke
Walse Patil's Challenge to : ‘त्यांनी एकदा नशीब आजमावून पाहावे...’ ; वळसे पाटलांनी कुणाला दिले चॅलेंज?

बेनके म्हणाले की, माजी आमदार वल्लभ बेनके आणि कुटुंबीयाने आयुष्यभर पवार कुटुंबांशी निष्ठा जपली आहे. मात्र, विद्यमान राजकीय वातावरणात निर्णय घेत असताना हृदय आणि डोक्याची घालमेल झाली आहे. शरद पवार यांना माझ्या हृदयात दैवत म्हणून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेते म्हणून स्थान आहे. या दोघांनाही मी बाजूला करू शकत नाही, त्यामुळे मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची परिस्थिती पाहता विधानसभेची २०२४ ची निवडणूक न लढविण्याची माझी मानसिकता झाली आहे, अशी व्यथाही बेनके यांनी बोलून दाखवली.

NCP MLA  Atul Benke
Walse Patil Offer to Rohit Pawar : मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबेगावमधून उभे राहा; वळसे पाटलांनी दिली होती रोहित पवारांना ऑफर

बेनके आणि पवार कुटुंबीयांमध्ये गेल्या ४५ वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. माझे वडील माजी आमदार वल्लभ बेनके यांना दोन वेळा आलेली मंत्रिपदाची संधी गेली तरी शरद पवार यांची साथ कधीही सोडली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००४ नंतर जुन्नरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. निधीसाठी मला अजितदादा आणि दिलीप वळसे पाटील यांची कायम साथ मिळाली. तालुक्यातील बिबट सफारी डीपीआर, पिंपळगाव जोगे कालवा, किल्ले शिवनेरी विकास परिसर, रस्ते, बिबट निवारा केंद्र आणि बंधाऱ्यांची कामे अजित पवारांमुळे मार्गी लागली आहेत. त्यांनी चिल्हेवाडी पाइपलाईनच्या कामासाठीही निधी दिला आहे, असेही बेनके यांनी स्पष्ट केले.

NCP MLA  Atul Benke
Walse Patil News : मला ईडी, सीबीआयची नोटीस नाही, पण ‘या' कारणांमुळे अजितदादांसोबत गेलो; वळसे पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

आमदार अतुल बेनके म्हणाले की, राजकारणासाठी नव्हे; तर विकासकामासाठी जुन्नरच्या जनतेने मला निवडून दिलेले आहे. माझ्या आमदारकीचा आणखी एक वर्षाचा कालावधी उरलेला आहे. या वर्षभरात जास्तीत जास्त विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी माझी संघर्ष राहील. पण सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे आईच्या सल्ल्यानुसार मी विधानसभेची आगामी २०२४ ची निवडणूक न लढविण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र, जनतेने दिलेले प्रेमाच्या ऋणात राहून त्यांच्या सेवेसाठी बेनके कुटुंबीय सदैव काम करीत राहील.

NCP MLA  Atul Benke
Praful Patel News ‘खासदार प्रफुल्ल पटेल त्याचवेळी राजीनामा देणार होते...’

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, विनायक तांबे, बाळासाहेब खिलारी, उपसभापती प्रकाश ताजने, गणेश वाजगे, विकास दरेकर,उज्वला शेवाळे, आरती ढोबळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com