Ajit Pawar: अजितदादांच्या 'पीएच.डी.'वर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर बार्शीत गुन्हा दाखल

Maharashtra Assembly Winter Eession: गुन्हा दाखल झाल्यानंतर गौरव डोंगरेने ही फेसबुक पोस्ट डिलीट केली.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'पीएच.डी.' करून दिवे लावण्याच्या केलेल्या विधानावरून समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांना ट्रोल केले जात होते. अशातच अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरक आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजितदादांच्या पीएच.डी. करून दिवे लावण्याच्या वक्तव्यावरून फेसबूकला गौरव गजानन डोंगरे याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. अकोला येथील रहिवासी असणाऱ्या गौरवने शनिवारी ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने ही फेसबूक पोस्ट डिलीट केली आहे.

सध्या नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अजित पवारांनी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या विधानावर ते सोशल मीडियावर ट्रोल झाले. पीएच.डी. करणारे विद्यार्थ्यांनी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

सारथी, बार्टी, महाज्योती आदी संस्थांच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर अधिवेशान चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विधान परिषदेत यावर बोलताना “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. हा आकडा खूपच कमी आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

Ajit Pawar
Nagpur News : मुख्यमंत्री शिंदेंनी वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण; आपला ताफा थांबवत...

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच.डी.करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिवचणारे विधान केले."पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत," असे विधान त्यांनी केले. अजितदादांच्या या विधानामुळे अधिवेशनास उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सतेज पाटील यांनी दादा असं काय म्हणताय तुम्ही, या योजनेमुळे राज्यात पीएच.डी.धारकांची संख्या वाढेल. बार्टी, सारथी किंवा महाज्योतीसारख्या संस्थांमुळे पीएच.डी.धारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल. त्याने काही नुकसान होणार नाही, असे म्हटलं होतं. मात्र, आता अजित पवार यांचे हे विधान सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com