Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama

Prajakt Tanpure: सरकारी डेपो वाळू विक्रीत अनेक त्रुटी; आमदार तनपुरे आक्रमक, अचानक भेट देत...

Ahmednagar Politics: आमदार तनपुरे ॲक्शन मोडमध्ये...; सरकारी वाळू डेपो रडारवर
Published on

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार प्राजक्त तनपुरे हे सरकारी वाळू डेपोबाबत चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आलेत. राहुरीतील डिग्रस येथील सरकारी वाळू डेपोला अचानक भेट दिल्यावर तो वाळू डेपो बंद असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी सरकारी वाळू विक्री व्यवस्थेतील त्रुटीवर बोट ठेवले. वाळू वाहतूकदारांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर घेतल्यास आमदार तनपुरे यांनी कारवाईची मागणी केली.

आमदार तनपुरे म्हणाले, "राज्य सरकारने नागरिकांना 600 रुपये दरामध्ये वाळू विक्रीचा निर्णय चांगला आणि स्वागतार्ह आहे. सरकारने वाळू विक्रीतील त्रुटी दूर केल्या पाहिजेत. वाळू वाहतुकीच्या दरातदेखील सुसूत्रता आणली पाहिजे.

वाळू वाहतुकीसाठी लागणारे पैसे रोखीने न स्वीकारता ते आॅनलाइन घेतल्यास सरकारला वाळू खरेदीचा फायदा होईल. सरकारने वाळू वाहतूकदाराला थेट रोख पैसे घेण्याचा आदेश केला आहे. सरकारने वाहतुकीच्या दराचा संबंधच ठेवू नये, अशी मागणी आमदार तनपुरे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाळू वाहतुकीसाठी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने ठरवलेला दर 31 रुपये किलोमीटरपासून ते 68 रुपये किलोमीटर आहे. त्या दराने वाळू वाहतूक होताना दिसत नाही. सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा दहा पटीने म्हणजे 300 रुपये प्रति किलोमीटर दराने वाहतूक सुरू आहे.

सरकारने ठरवलेले वाळू वाहतुकीचे दर व्यवहार्य नाहीत. त्यात दुरुस्ती गरजेची आहे. वाळू वाहतूकदार सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारतील. तसे होतदेखील असेल. अशा प्रकारांवर सरकार लक्ष ठेवणार का? तक्रार झाल्यास कारवाई झाली पाहिजे, असेही आमदार तनपुरे यांनी म्हटले.

तनपुरेंनी ऑनलाइन वाळू बुकिंग केली, परंतु....

डिग्रस येथील वाळू डेपोस भेट दिल्यावर आमदार प्राजक्त तनपुरे यांना तिथे अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या. वाळुचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी आमदार तनपुरे यांनी प्रयत्न केला. परंतु बुकिंग झाले नाही. सेतू केंद्रावरून बुकिंग केले. ते झाले. परंतु पैसे भरण्यास अनेक अडचणी आल्या. यात नागरिकांना मनस्तापच वाट्याला येतो, असे तनपुरे यांनी म्हटले.

(Edited by- Ganesh Thombare)

Prajakt Tanpure
Gram Panchayat Strike: राज्यभरातील गाव कारभार ठप्प; ग्रामसेवक, सरपंचाचं तीन दिवस कामबंद आंदोलन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com