Sudhir Tambe News: मोठी बातमी : डॉ. सुधीर तांबेंचे निलंबन लवकरच मागे घेणार ; नगर जिल्हा काँग्रेसकडून हिरवा कंदील.

Sudhir Tambe Suspension News : डॉ. सुधीर तांबे यांना लवकरच सन्मानाने पक्षात घेतले जाईल, असे हंडोरे यांनी स्पष्ट केले.
Dr. Sudhir Tambe
Dr. Sudhir Tambe Sarkarnama

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political News: सहा वर्षांसाठी निलंबित झालेले माजी आमदार डॉ. सुधीर तांबेंना पुन्हा सन्मानाने पक्षात घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी पक्षाने AB फोर्म दिला तरीही डॉ. सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही म्हणून पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन मागे घेण्याबाबत पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी संकेत दिले आहेत.

डॉ.सुधीर तांबेंचे निलंबन लवकरच मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा ठराव नगर जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाच्या बैठकीत संमत झाला आहे. हंडोरे यांनी या ठरवाला संमती दाखवत पक्षाच्या कोअर बैठकीत तांबे यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी भूमिका मांडू असे सांगितले आहे.

Dr. Sudhir Tambe
Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा ; महाविकास आघाडीत संघर्ष होणार ?

डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रभावी नेतृत्वाची पक्षाला गरज असून त्यांना लवकरच सन्मानाने पक्षात घेतले जाईल, असे हंडोरे यांनी स्पष्ट केले. नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत हंडोरे बैठका घेत आहेत. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर पक्षाला अनुकूल परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डीच्या जागेवर शिवसेना(उद्धव ठाकरे गट) आणि नगर दक्षिणेवर राष्ट्रवादी(शरद पवार गट)चा दावा आहे.

दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेत (शिर्डी लोकसभा) काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात आणि लहू कानडे असे दोन आमदार आहेत. त्यात विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पक्षातून निलंबित केलेले माजी आमदार सुधीर तांबे यांना पक्षात घेतले तर पक्षाची ताकत वाढणार आहे.

Dr. Sudhir Tambe
Thane News : ठाण्यातील 'आपला दवाखाना' पाहा ; १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा जागेबाबत झालेल्या चाचपणीत काँग्रेसने उमेदवारीवर दावा केला असताना डॉ.तांबे यांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव संमत करण्यात आला. डॉ. तांबे हे बाळासाहेब थोरतांचे मेव्हणे आहेत तर आमदार सत्यजित तांबे यांचे मामा आहेत. त्यामुळे डॉ.तांबे यांचा पक्षप्रवेश झाल्यास सत्यजित तांबे यांचेही निलंबन मागे घेतले जाऊ शकते. मात्र सत्यजित तांबे यांची यावरील भूमिका अजून पुढे आलेली नाही.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com