Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा ; महाविकास आघाडीत संघर्ष होणार ?

Maharashtra Politics : शिर्डीची जागा आम्ही आग्रहाने काँग्रेससाठी मागणार असल्याचे चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले .
Shirdi Lok Sabha Constituency News
Shirdi Lok Sabha Constituency News Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar: शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे दोन आमदार असून पक्षाचे मजबूत संघटन सहाही विधानसभा मतदारसंघात आहे. काँग्रेसला मानणारा मोठा मतदार शिर्डी लोकसभा मतदारसंघात असल्याने शिर्डीची जागा आम्ही आग्रहाने काँग्रेससाठी मागणार असल्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले .

हंडोरे हे शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक आहेत. रविवारी त्यांनी संगमनेर येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी या जागेवर दावा केला.

Shirdi Lok Sabha Constituency News
Jayant Patil On CM Shinde: ठाण्यातील 'आपला दवाखाना' पाहा; १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

शिर्डी लोकसभेत 2014 आणि 2019 ला शिवसेनेचे सदाशिव लोखंडे युतीकडून निवडून आले आहेत. मात्र शिवसेनेतील बंडानंतर लोखंडे एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. मात्र ठाकरे गटाकडून शिवसेनेचे 2019 च्या लोकसभेत 18 खासदार निवडून आलेल्या जागांवर दावा करण्यात आला आहे. या परिस्थितीत आता काँग्रेसकडून शिर्डी मतदारसंघावर दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

हंडोरे म्हणाले, "देशातील आणि राज्यातील परिस्थिती आता बदलली आहे. राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे. अशा परिस्थितीत उगाच जागांचा आग्रह करण्यापेक्षा कोणत्या पक्षाला सध्य परिस्थितीत कोणता मतदारसंघ अनुकूल आणि उमेदवार निवडून येईल अशाच ठिकाणी आग्रह केला पाहिजे. यासाठी सर्वांनी लवचिक भूमिका घेत गरज असेल तिथे मतदारसंघ अदलाबदल करण्याची तयारी ठेवली आहे,"

Shirdi Lok Sabha Constituency News
Rohit Pawar Statement On Shinde Group: रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; शिंदे गटाचे दहा आमदार नाराज, ठाकरेंकडे येण्यासाठी उत्सुक...

महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य निर्णय करतील, असा विश्वास हंडोरे यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत 48 पैकी जास्तीत जास्त जागा आघाडीच्या निवडून कशा येतील याकडे पाहिले पाहिजे. बैठकीनंतर शिर्डी लोकसभेची जागा मागणार असल्याचा अहवाल 16 ऑगस्टच्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत ठेवला जाईल. आपले वैयक्तिक मतही शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी अशी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाही अभिप्राय घेतला जाईल, असे चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले. बैठकीस श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, करण ससाने, उत्कर्ष रूपवते, हेमंत ओगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com