Shashikant Shinde Aggresive : 'मी काय आहे, ते दाखवून देणार...’ ; शशिकांत शिंदेंनी साताऱ्यातील नेत्यांना भरला दम

Satara Lok sabha Election 2024 : माझ्याविरोधात प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री व आमदारांना सातारा जिल्ह्यात येऊन सभा घ्याव्या लागल्या. तरीही जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने पाच लाख ३६ हजार मते मला दिली.
Shashikant Shinde
Shashikant ShindeSarkarnama

संदीप गाडवे

Jawali NCP News : लोकसभा निवडणुकीत माझा पराभव तांत्रिक झाला आहे. माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री व आमदारांना सातारा जिल्ह्यात येऊन सभा घ्याव्या लागल्या. तरीही जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने पाच लाख ३६ हजार मते मला दिली, हे थोडे थोडके नाही. त्यामुळे विजय आपलाच होता, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला

सातारा (Satara) जिल्ह्यात शशिकांत शिंदेंचे (Shashikant Shinde) महत्व वाढेल म्हणून काहींनी भीतीपोटी सहकार्य केले नाही. त्यामुळेच पराभवाला सामोरे जावे लागले. या अपयशाने खचून जाणारा मी नाही. शशिकांत शिंदे काय आहे हे, आता सातारा जिल्ह्यातील नेत्यांना दाखवून देणार, असा इशारा आमदार शशिकांत शिंदेंनी दिला आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या आमदार निधीतून केडंबे (ता. जावळी) येथे मंजूर झालेल्या सभामंडपाचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, महायुती सरकारकडे जनतेच्या विकासाचा निर्णय नाही. जातीय वाद, बेकारी, बेरोजगारी वाढविण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. आंध्र प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश या ठिकाणी भाजपला सहकार्य झाले नसते तर, भाजपचे सरकार आले नसते. दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन स्थापन झालेलं सरकार जास्त दिवस चालणार नाही.

मी पराभवाला घाबरत नाही. विजयी झालो असतो तर खासदार काय असतो, हे राज्याला दाखवून दिले असते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता महाविकास आघाडीचीच येणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Shashikant Shinde
Threat to Bharat Shah :रवींद्र वायकरांच्या मेहुण्याविरोधात तक्रार देणाऱ्या भरत शहांना धमकी

आगामी काळात पक्ष संघटना व शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करून जिल्हा यशवंत विचारांचा आहे, हे सिद्ध करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करु, अशी ग्वाहीही शशिकांत शिंदे यांनी दिली.

Shashikant Shinde
Maratha Reservation : ‘निवडणुकीत जरांगेंसोबत फोटो काढण्यासाठी धडपडणाऱ्या प्रणिती शिंदेंनी मराठ्यांची फसवणूक केली’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com