Sangali Politics : जत तालुक्याला दुष्काळी झळा आतापासूनच सोसाव्या लागत असून मे महिन्यापर्यंत तालुक्याची अवस्था वाईट होईल. तांत्रिक गोंधळ घालून येथील माणसे मारणार आहात का, असा सवाल उपस्थित करत आमदार विक्रम सावंत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, जत तालुक्याचा दुष्काळच्या यादीत समावेश करावा, अशी मागणीही विक्रम सावंत यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी नागपूरच्या एका कंपनीवरही गंभीर आरोप केले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागपूरच्या एका कंपनीने गोंधळ घातला आहे. जतसारख्या दुष्काळ सहन करणाऱ्या तालुक्याला टंचाईच्या यादीतून वगळले जाते, हे गंभीर आहे. वस्तुस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करा, प्रत्यक्ष पाहणी करा. जतला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
- वरिष्ठ भू वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार आवर्तन प्रवण क्षेत्र घोषित करण्यासाठी 400 ते 600 मि.मी.पाऊस अपेक्षित असावा. पण जत तालुक्यातील वार्षिक सरासरी पाऊसमान पाहिले तर 427 ते 500 मी. मी आहे.
- जत तालुक्यात यंदा गेल्या पाच वर्षातील पर्जन्यमान 340 मि.मी. इतके झाले असून खरीप हंगामातील पिकांची पेरणी केवळ 46 % वर झाली आहे.
- सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक जास्त तलाव जत तालुक्यात आहेत. 27 तलावात केवळ तीन टक्के पाणी शिल्लक आहे. 10 तलावांचे पात्र कोरडे झाले असून 12 तलावात मृतसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील 25 गावात 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवाळीपूर्वीच दुष्काळाच्या तीव्र झळा या तालुक्याला बसत आहेत.
दुष्काळाचे मूल्यांकन महामदत मोबाईल ॲपद्वारे केले गेले आहे. त्यानुसार ट्रिगर ठरवले आहेत. त्याचा अंतिम अहवाल महिनाखेरीस येईल. त्यात जतचा दुष्काळी तालुक्यांत समावेश करावा, अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.