Nana Patole On Eknath Shinde : 'भविष्यात तुम्हाला शेतीच करावी लागणार' ; नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला!

Nana Patole On Narendra Modi : 'मोदींनाही पुढील काळात ध्यानच करत बसायचे आहे.', असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे.
Eknath Shinde, Nana Patole
Eknath Shinde, Nana PatoleSarkarnama

Nana Patole at Karad : 'सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात त्याचे भान ठेवा आणि राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेट द्या. शेतकरी आत्महत्या करत आहेत याकडे लक्ष द्या.आगामी काळात पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे.', असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. याचबरोबर महाराष्ट्रात कॉंग्रेस लोकसभेच्या सर्व जागा जिंकेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) गुरुवारी कराड (जि.सातारा) येथील विमानतळावरुन भुईंजला रवाना होण्यासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने संविधान वाचवा म्हणून प्रचार केला, पण त्याचा घटक पक्ष असलेल्या एका आमदाराने संविधानाच्या विरोधात कृती केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Nana Patole
Vijay Wadettiwar On Dhananjay Munde: शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात अन् कृषिमंत्री परदेशात...; वडेट्टीवारांचा मुंडेंवर संताप

या प्रश्नावर पटोले म्हणाले, 'याचे उत्तर जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad)च देतील मात्र, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले गेले याचे समर्थन कोणीही करणार नाही. पण मनुस्मृती अभ्यासात यावी हा भाजपचा प्रयत्न आहे. त्याला काँग्रेसचा नेहमीच विरोध राहील. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव असुन तो ग्रंथ कालबाह्य झाला आहे.'

मोदींना ध्यानच करावे लागणार -

याशिवाय पंतप्रधान मोदी(Narendra Modi निवडणूक प्रचार संपवून कन्याकुमारीला जाऊन ध्यानस्थ होणार आहेत. त्यावरही नाना पटोलेंनी टिप्पणी केली, 'पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे ते शेवटचेच ध्यान आहे. काँग्रसने त्यांच्या ध्यानाची धास्ती घेतलेली नाही. भाजपने पेरलली ती आफवा आहे. आम्हाला त्यांच्या ध्यानाची धास्ती नाही.सध्या आचारसंहिता असल्याने त्यांचे ध्यान माध्यमातून येवू नये, अशी आमची अपेक्षा आहे.नरेंद्र मोदी म्हणून त्यांना पुढील काळात आता ध्यानच करत बसायचे आहे.' असं पटोलेंनी म्हटलं आहे.

Eknath Shinde, Nana Patole
Prithviraj Chavan News: महात्मा गांधींबाबत मोदींच्या 'त्या' वक्तव्यावरुन पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे -

याशिवाय 'गरिबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. श्रीमंत लोक, त्यांची मुलं पबमध्ये राहतील तेथून गाडीची रेस लावून गरीबांना चिरडून टाकतील. आम्ही त्यावर बोललो की सत्ताधाऱ्यांना स्टंट वाटत आहे.' असे पटोले म्हणाले.

तसेच, 'पुणे अपघातात त्या गाडीत कोण कोण होते हे पुढे का येत नाही ? पोलीस प्रकरण का दाबत आहेत ? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. कारण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. राज्याच्या जनतेने कोणाकडे दाद मागावी हा प्रश्नच आहे. त्यामध्ये कोणाचा दबाव आहे हे सगळे समोर आले पाहिजे. श्रीमंतांना वेगळा कायदा आहे का? या प्रकरणी जनता भयभीत आहे. म्हणून मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com