Solapur News : चिमणी पाडल्यानंतर काडादींना नाना पटोलेंचा फोन; ‘त्यांनी कारखान्याची चिमणी पाडली; आपण त्यांना पाडू’

काँग्रेस पक्ष हा सिद्धेश्वर परिवार, काडादी परिवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.
Dharmraj Kadadi -Nana Patole
Dharmraj Kadadi -Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Siddheshwar factory's chimney : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशनची चिमणी जमीनदोस्त कटरच्या साहाय्याने गुरुवारी (ता. १५ जून) जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन करून कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक धर्मराज काडादी यांना पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे. ‘त्यांनी कारखान्याची चिमणी पाडली, आता आपण त्यांना पाडू,’ असा इशाराच पटोले यांनी काडादी यांच्याशी बोलताना दिला. (Nana Patole's call to Dharmraj Kadadi after chimney of Siddheshwar factory was demolished)

Dharmraj Kadadi -Nana Patole
Ajit Pawar Criticized State Government: राज्यातील सरकार शेतकरीविरोधी; अजित पवारांनी डागली तोफ

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar factory) चिमणी पाडल्यानंतर अनेकजण काडादी आणि कारखान्याच्या कामगारांना फोन करून धीर देत आहेत. त्यातच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांना फोन करून धीर देत पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला. ते म्हणाले की, तुम्ही काय घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. त्यांनी कारखान्याची चिमणी पाडली, आता आपण त्यांना पाडू. हे लोक नालायकच आहेत. हीच त्यांची वृत्ती आहे. त्यांना माणुसकी नावाचा इश्यूच नाही. आम्ही आहेत, तुमच्या पाठीशी.

Dharmraj Kadadi -Nana Patole
Ajit Pawar CM News : अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी आमदाराची शपथ; पवार म्हणतात, ‘त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. कारण...’

मी येत्या २३ तारखेला सोलापूरला येतो, तुमच्याकडंही येणार आहे, असेही नाना पटोले यांनी माजी अध्यक्ष काडादी यांना सांगितले. त्यामुळे येत्या २३ तारखेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले काय भूमिका घेतात, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे. या वेळी बोलताना काडादी म्हणाले की,‘व्यक्तीद्वेष किती असू शकतो. एखाद्या संस्थेला एवढं हे करायचं....’

Dharmraj Kadadi -Nana Patole
YSR Congress News: खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण; पोलिसांनी अवघ्या काही तासांतच केली सुटका..

काँग्रेस कार्याध्यक्षांना पाठविले काडादींच्या घरी

याबाबत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले की, आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘काडाडी यांची भेट घ्या आणि तेथून मला फोन लावून द्या’, असे सांगितले होते. त्यानंतर मी काडादी यांची भेट घेतली. त्यांचे पटोले यांच्याशी बोलणे करून दिले. येत्या २३ तारखेला ते सोलापूरला येणार आहेत, त्यावेळी ते कारखाना स्थळी भेट देणार आहेत. काँग्रेस पक्ष हा सिद्धेश्वर परिवार, काडादी परिवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com