Kolhapur Politics : स्थानिकच्या निवडणुकांमध्ये कमळ अन् घड्याळासमोरील बटण दाबा, अजितदादांच्या शिलेदाराने शिवसेनेचं नावं घेणं टाळलं, चर्चांना उधाण

Hasan Mushrif Kagal Political Rally : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन आम्ही दिलं आहे. हे वचन आम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहेत. कमळ आणि घड्याळ समोरील खटाखट बटणे दाबा आणि आमच्या उमेदवारांना विजयी करा.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 27 Jul : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन आम्ही दिलं आहे. हे वचन आम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहेत.

कमळ आणि घड्याळ समोरील खटाखट बटणे दाबा आणि आमच्या उमेदवारांना विजयी करा. आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील वंदूर येथे झालेल्या मेळाव्यात दिली.

मात्र, ही ग्वाही देताना त्यांनी केवळ भाजप आणि राष्ट्रवादीचे नाव घेतले शिवसेनेचा उल्लेख मात्र मुश्रीफांनी टाळला. याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. याच मेळाव्यात बोलताना मुश्रीफ म्हणाले, लग्नात रुखवत देताच तसे दहा हजाराच्या भांड्याचा सेट आम्ही कामगारांना दिला.

Hasan Mushrif
NCP Politics : पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का! 'हा' माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, मुहूर्तही ठरला

तालुक्यातील मतदारांना एवढे सेट आम्ही वाटले पण मते कमी पडली. भांड्याचा सेट घेऊन देखील मते दिली नाहीत. मात्र लोकांच्या प्रेम, जिव्हाळा आणि आदराच्या भावनां ठेवावी लागते आणि लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. त्याला जे वाटेल ते तो करत असतो. आपणच कमी पडलो त्या मतदाराचे मत मिळवायला.

पण निस्वार्थ भावनेने आम्ही काम करत राहिलो. शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देण्यावरून मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हणून काही शेतकरी कर्ज फेडत नाहीत.

Hasan Mushrif
BJP Kirit Somaiya PUNE : मशिदींबाबत धक्कादायक माहिती समोर; किरीट सोमय्यांनी मागवली होती पुणे पोलिसांकडे माहिती

त्यामुळे जिल्हा बँका अडचणीत येतात. पण मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना 50 हजार काय 1 लाखांचं अनुदान देतो, असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे अजितदादांच्या आधीच मुश्रीफांना मुख्यमंत्रि‍पदाचे डोहाळे लागले की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com