Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा सातारा दौरा पुढे ढकलला; पुढची तारीख लवकरच मिळणार

Political News : आंधळी धरणाचे जलपूजन व साताऱ्यात शिवसन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्याच्या दौऱ्यावर शिवजयंती दिनी येणार होते.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा काही कारणाने पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आता पुढची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

माण तालुक्यातील आंधळी धरणाचे जलपूजन व साताऱ्यात शिवसन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनी येणार होते. हा दौरा पुढे ढकलल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली माण व सातारा तालुक्यातील तयारी वाया गेली आहे.

Narendra Modi
Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात 'चारशे पार' प्रचंड बहुमताने पुन्हा भेटू...

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45 प्लस जागा जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे, यामध्ये पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये सातारा व माढा या दोन मतदारसंघातून भाजपचा खासदार निवडून आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सातारा जिल्ह्यात वाढले आहेत.

साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी सुरू केली आहे.तर माढामधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शड्डू ठोकला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होणार होता. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या जिरहे कटापूर योजनेचे पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणात सोडण्यात आले आहे. या पाण्याचे जलपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 19 फेब्रुवारीला होणार होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यासोबतच याच दिवशी साताऱ्यात राजघराण्याच्या वतीने दिला जाणारा शिवस्मान पुरस्कार पंतप्रधान मोदींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार होता. त्यासाठी माण आणि साताऱ्यात आमदार जयकुमार गोरे आणि खासदार उदयनराजे भोसले (Udaynaraje bhosle) यांच्याकडून जोरदार तयारी सुरू होती. पण, काही कारणास्तव पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांचा 19 फेब्रुवारीला होणार सातारा व माणचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपच्या (Bjp ) पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दौऱ्याची सातारकरांना उत्सुकता

याबाबत भाजपचे सातारा जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी यांनीही दुजोरा दिला आहे. पुढे ढकललेला हा दौरा पुन्हा कधी होणार याची सातारकरांना उत्सुकता आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, त्यापूर्वी हा पुढे ढकललेला पंतप्रधान मोदींचा दौरा होणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले आहे.

(Edited By- Sachin Waghmare)

Narendra Modi
Narendra Modi : 5 वर्षांतील भाजप सरकारच्या कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींनी वापरले 'हे' खास तीन शब्द!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com