Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कराडला काय बोलणार? जिल्ह्यावासीयांत उत्सुकता !

Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Satara News : लोकसभेच्या पोटनिवडणुकीनंतर जवळपास साडेचार वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) दुपारी साडेचार वाजता सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सैदापूरला सभा होत आहे. साडेचार वर्षांपूर्वीही ते लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या प्रचारासाठीच साताऱ्यात आले होते. त्या वेळी छत्रपतींच्या स्वप्नातील भारत घडवण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. कऱ्हाडच्या सभेत ते कोणत्या मुद्द्यांना स्पर्श करणार, काय भूमिका मांडणार? याची जिल्हावासीयांना उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी टिपेला पोचली आहे. दोन्ही बाजूंकडून आपले मुद्दे मतदारांपर्यंत पोचविण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने आपला हुकमी एक्का साताऱ्याच्या रणांगणात उद्या उतरवला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सैदापूर येथील सभेला संबोधित करणार आहेत. त्यासाठीची तयारी पक्षाच्या पातळीवर पूर्ण झाली आहे. या सभेच्या निमित्ताने 2019 मध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ साताऱ्यात झालेल्या सभेच्या आठवणीला उजाळा मिळाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Narendra Modi News: सोलापूरकरांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलोय; पीएम मोदींनी घातली भावनिक साद

मोदींचे 2019 मधील भाषण

मोदी पहिल्यांदाच साताऱ्यात येत असल्यामुळे लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्या सभेमध्ये मोदींनी 27 मिनिटे केलेल्या भाषणात विकास व योजना, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, साताऱ्याची भूमी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे व छत्रपतींचे घराणे व विचार या मुद्द्यांवर भूमिका मांडत विरोधकांवर टीकाही केली होती. हे मुद्दे मांडतानाच छत्रपतींच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता, तसेच देश, विदेशातील पर्यटकांची पसंती मिळणाऱ्या १५ ठिकाणांमध्ये साताऱ्याचा समावेश करण्याचा शब्द सातारकरांना दिला होता. मोदींच्या सभेतील प्रमुख मुद्द्यांचा हा उजाळा.

महाराजांचे संस्कार सोबत

मोदी त्यावेळी म्हणाले होते, ‘‘भाजपसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होतेच, आता त्यांचा संपूर्ण परिवारही आमच्या सोबत आला आहे. संस्कार आणि परिवाराचा हा संगम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्थान एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी ऊर्जा देणारा आहे. महायुतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्कारानुसार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवाद, राष्ट्ररक्षेला प्राधान्य दिले आहे. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आरमार उभारले, त्याप्रमाणे आम्ही पाच वर्षांत सैन्याची ताकद वाढवून जगातील ताकदवर देशांत समावेश केला आहे.’’

Narendra Modi
Losabha Election 2024 : मोदी, राहुल गांधींच्या गॅरंटीत मतदारांचे प्रश्न पडले बाजूला...

मलई खाणे हाच त्यांचा संस्कार...

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर मोदींनी टीका केली होती. महायुती महाराष्ट्राला महान बनविण्याच्या मिशनवर चालली असताना आघाडीत अंतर्गत चढओढीच्या गडबडी आहेत. सर्वांनी मिळून मलई खाणे हा त्यांचा संस्कार आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

त्यांना हवेची दिशा समजते

मोदींनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. सातारा जिल्ह्याला ते अभेद्य किल्ला मानत असतील; पण त्या किल्ल्यातून लोकसभा लढण्याची हिंमत त्यांनी केलेली नाही. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांना पुढे केले. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर ते मागे सरले. हे कसले कसलेले पैलवान. त्यांना हवेची दिशा चांगलीच समजते. त्यामुळे तेही उभे राहिले नाहीत, असे मोदींनी तेव्हा म्हटले होते.

Narendra Modi
Prakash Ambedkar News : बारामतीत उमेदवार का दिला नाही? आंबेडकरांनी केला गौप्यस्फोट

पगडी, तलवार इनामदारांचे तैलचित्र भेट...

खासदार उदयनराजेंकडून मोदींना पगडी, तलवार व छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मुद्रा देण्यात आली होती. भाजपच्या (BJP) वतीने गुरुवर्य लक्ष्मराव इनामदार यांचे तैलचित्र भेट दिले होते. 370 कलम हटविल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी ३७० कमळाच्या फुलांचा हार घालून तलवार भेट देऊन स्वागत केले होते.

त्या भाषणातील हे होते प्रमुख मुद्दे...

- मराठा आरक्षण महायुतीने करून दाखविले.

- साखरेसाठी सहा हजार कोटी अनुदान

- शेतकऱ्यांसाठी महायुती योग्य विचाराने काम करतेय.

- पेट्रोल, डिझेलमध्ये इथेनॉलचा दहा टक्के वापर करणार.

- मुद्रा योजनेतून कोटी रोजगार उपलब्ध करून दिले.

- पर्यटन वाढीसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणार.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Narendra Modi
Pawar Attack On Modi : शरद पवारांनी मोदींना घेरलं; ‘शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलं’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com