Pawar Attack On Modi : शरद पवारांनी मोदींना घेरलं; ‘शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलं’

Lok Sabha Election 2024 : शरद पवार यांनी शेवगावमधील ताजनापूर पाणी योजना, मिनी एमआयडीसी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत ही निवडणूक हुकूमशाही संपवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.
Sharad Pawar-Narendra Modi
Sharad Pawar-Narendra Modi Sarkarnama

Nagar, 29 April : मोदी सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरून शरद पवार यांनी चांगलेच घेरले आहे. ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय घोडे मारले’, असा प्रश्न राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचारासाठी शेवगावमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा झाली. काॅंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, माजी आमदार दादा कळमकर, राजेंद्र फाळके, नितीन काकडे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : शरद पवार, दहा जागा लढवणाऱ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष! मंत्री विखेंनी डिवचलं

शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाषणाच्या सुरुवातीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टार्गेट केले. हुकूमशाहीविरोधात ही लढाई आहे. शेवगावमधील ताजनापूर पाणी योजना, मिनी एमआयडीसी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शरद पवार यांनी या वेळी दिले.

‘संविधानात बदल करण्यासाठी मोदी सरकार अधिकार वाढवण्याची भाषा केंद्रातील मंत्री करत आहेत. या हुकूमशाही विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. केंद्र सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिली. गुजरातमधील शेतकरी आमचेच आहेत. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे काय घोडे मारले आहे", असा सवाल शरद पवार यांनी या वेळी उपस्थित केला.

Sharad Pawar-Narendra Modi
Abhijeet Patil Meet Fadnavis : लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू; फडणवीसांचा अभिजित पाटलांना शब्द

मोदी सरकार काळ्या आईचे ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचे नाही. भाजप सरकार टीका करणाऱ्यांवर कारवाई करते. दिल्ली, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना टीका केली म्हणून तुरुंगात टाकले. प्रश्न सोडवण्याऐवजी मोदी सरकार अटकेची कारवाई करते, अशी टीका शरद पवार यांनी केली.

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टीका केली. ही लढाई गरिबांची आहे. पैशाचा, सत्तेचा गर्व ज्यांना आहे, त्यांचे गर्वहरण करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले. त्रास देणे हा त्यांचा पिंड आहे. त्याला न घाबरता निवडणुकीत उतरा. तसेही ते निवडणुकीनंतर त्रास देणारच नाहीत, असेही थोरात यांनी म्हटले.

Edited By : Vijay Dudhale

R

Sharad Pawar-Narendra Modi
Solapur Politics: मोदींच्या सभेपूर्वी पवारांच्या निकटवर्तीय नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com