Narendra Patil on Shashikant Shinde : 'त्या' घोटाळ्याकडे बोट दाखवत नरेंद्र पाटलांनी डागली शशिकांत शिंदेंवर तोफ

Narendra Patil on Shashikant Shinde : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर ताेफ डागली आहे.
Narendra Patil
Narendra PatilSarkarnama
Published on
Updated on

Karad News : सातारा जिल्ह्याचा लोकसभेचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांच्छनास्पद आहे. त्याचे मला खूप वाईट वाटते. अशा व्यक्तीला उमेदवारी मिळत असेल तर मग शरद पवार यांना आम्ही काहीच बोलू शकत नाही, अशी तोफ आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर डागली.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या Satara Lok Sabha Constituency निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी 2019 मध्ये सातारा लोकसभेचा उमेदवार होते. त्यावेळी सध्याच्या उमेदवारांनी बेंबीच्या देठापासून मला प्रत्यक्षात विरोध केला. एका माथाडी चळवळीत काम केल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी आम्ही व आमच्या परिवाराने प्रयत्न केले. शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदारसंघातून झाला. 2019 मध्ये आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात त्यांनी कटकारस्थान लादले. ते सध्या उमेदवार असल्यामुळे त्यांना रिटर्न गिफ्ट देण्याची संधी मला लाभली आहे. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे. एका-एका गोष्टीचा उलगडा आम्ही त्या-त्या वेळी करू, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Narendra Patil
Madha Lok Sabha 2024: निंबाळकरांच्या नको त्या उठाठेवीमुळे मोहिते पाटील स्वगृही, शरद पवारांना बळ

आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी निवडणूक आली की, काहीतरी प्रकरणे काढायची हा रडीचा डाव खेळू नका, असा टोला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला होता. त्या प्रश्नावर पाटील म्हणाले, शशिकांत शिंदे यांनी जर काहीच केले नसेल तर त्यांनी घाबरायची गरज नाही. मुतारीच्या घोटाळ्यात त्यांनी जामीन का घेतली ? लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याअगोदरच 'एफएसआय'चा एक नवीन गुन्हा उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. बाळासाहेब सोळसकर त्यावेळी चेअरमन होते आणि उमेदवार संचालक होते. त्यामुळे त्यांना काहीच केले नाही असे वाटत असेल तर त्यांनी घाबरायची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता समजेल माथाडींचा नेता कोण ?

माथाडी कामगारांत फूट पाडण्याचे काम भाजपने केले असा आऱोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला होता. त्यावर नरेंद्र पाटील म्हणाले, माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवत असतील तर फूट कुणी पाडली ? ज्या पक्षाने माथाडींच्या प्रमुख प्रश्नावर कधीही गांभीर्याने पाहिले नाही. ज्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर उपमुख्यमंत्रिपद घेऊन माथाडींचे प्रश्न मार्गी लावले नाहीत. त्यामुळे आम्ही अशा उमेदवाराला काय उत्तर द्यायचे ? त्यामुळे खरा माथाडीचा नेता कोण आहे, खरा माथाडी कामगार कोणाच्या पाठीमागे आहे आणि खरा माथाडी कामगारांचे प्रश्न कोण सोडवतो हे लवकरच स्पष्ट होईल.

R

Narendra Patil
Narayan Patil Resign Shivsena : मोहिते पाटलांनंतर माढ्यात महायुतीला आणखी एक धक्का; माजी आमदार पाटलांचा शिवसेनेचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com