Satara : पाचगणी पालिकेला 'नॅशनल टुरिझम अवॉर्ड'; नवीदिल्लीत मंगळवारी वितरण

या पुरस्काराने पाचगणीच्या Panchgani Palika शिरपेचात आणखी एक तुरा खोवला असल्याने मुख्याधिकारी CEO आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Panchgani Palika
Panchgani Palikasarkarnama
Published on
Updated on

भिलार : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा नॅशनल टुरिझम अवॉर्ड २०२२ सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगरपालिकेला जाहीर झाला आहे. येत्या २७ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.

या पुरस्काराबाबत दापकेकर म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशातील सर्व नगरपालिकांत पर्यटकांना कशाप्रकारे मूलभूत सुविधा दिल्या जातात, यांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये पाचगणी नगरपालिका अव्वल ठरली आहे. हे पुरस्कार वितरण २७ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे होणार आहे.’’

Panchgani Palika
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग

या पुरस्कारात पालिकेच्या माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे आणि सर्व नगरसेवक, पालिका कर्मचारी, शहरातील सर्व नागरिक यांचा वाटा असल्याचेही दापकेकर यांनी सांगितले. या पुरस्काराने पाचगणीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला असल्याने मुख्याधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com